वडेश्वर ग्रामपंचायत, धन्वंतरी मेडिकल अँन्ड सोशल फाउंडेशन आणि डॉ. बडे एक्सिडेंटल अँड मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वडेश्वर गावात मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ( free health camp at wadeshwar village in maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर शिबिराचे उदघाटन सरपंच छायाताई हेमाडे आणि बडे हॉस्पिटलच्या कार्यकारी अधिकारी लिसी मेनन यांच्या हस्ते झाले. धन्वन्तरी मेडिकल अँन्ड सोशल फाउंडेशन व बडे हॉस्पिटलच्या वतीने शिबिरामध्ये भाग घेतलेल्या लाभार्थ्यांना बडे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास 20 टक्के सवलताचे कार्ड मा उपसरपंच वासुदेव लष्करी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच शिबिरात डोळे, हाडांशी निगडित आजार अशा अनेक आजारांबाबत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
तसेच 100 रुपयामध्ये एक्स-रे आणि 50 रुपयामध्ये ई.सी.जी. तपासणी, आणि सीटी स्कॅन तपासणी करिता अल्प दर करणार असल्याचे लिसी मेनन यांनी सांगितले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, मा सरपंच छाया हेमाडे, डॉ. राहुल बडे, डॉ. संध्या बडे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– कार्ला लोणावळा येथील पर्यटन विकास प्रकल्पांना शिंदे-फडणवीस सरकारची मंजूरी!!
– शाब्बास!! पवना विद्या मंदिर शाळेचा दहावीचा निकाल ९८.३४ टक्के, तब्बल ९३ टक्के गुणांसह रितेश ठुले प्रथम