मावळ पंचायत समिती समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे, ग्रामीण रुग्णालय, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्यावतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 46 विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नेत्रदोष, कर्णदोष, वाचादोष, अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, बौद्धिक अक्षमता या विविध प्रवर्गातील 46 दिव्यांग विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. (Free medical checkup camp for disabled students at Dr Bhausaheb Sardesai Rural Hospital Talegaon Dabhade)
वडगाव मावळ ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा पाटील, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या डॉ. मनिषा गावंडे, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, मेडिकल सोशल वर्कर अश्विनी वनारसे, शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले यांचे विशेष सहकार्य मिळाले. विशेष साधन व्यक्ती शीतल शिशुपाल, विशेष शिक्षक स्मिता जगताप, साधना काळे, सुमित्रा कचरे, शकिला शेख, लता वणवे यांनी शिबिराचे संयोजन केले.
अधिक वाचा –
– सिडकोच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा, वाढीव रक्कम होणार कमी, लवकरच मिळणार ताबा । Maval Lok Sabha News
– पुढील 30 वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढवावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश; वाचा काय म्हणाले अजितदादा । Pune News
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचे लोणावळा शहर आणि ग्रामीण भागात छापे; 1 लाखाचा गुटखा जप्त, 2 जण ताब्यात । Lonavala Crime News