व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत ! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

ही योजना सर्व संस्थांतील नव्याने प्रवेश घेतलेल्या व सध्या शिकत असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 18, 2025
in देश-विदेश, महाराष्ट्र
com maharashtra devendra fadanvis

Photo Courtesy : x / com maharashtra


Dainik Maval News : आता अनाथ बालकांना व्यावसायिक शिक्षण मोफत घेता येणार आहे. ज्या अनाथ बालकांचे/कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये १०० टक्के लाभ शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

अनाथ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व परीक्षा शुल्कात 100 टक्के सवलत लागू असून, वार्षिक उत्पन्न ८ लाखांपर्यंत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना ही सवलत मिळेल. ही योजना सर्व संस्थांतील नव्याने प्रवेश घेतलेल्या व सध्या शिकत असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.

राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस, शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) (व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या अनाथ बालकांना नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या (अर्जाचे नुतनीकरण केलेल्या) अनाथ बालकांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये १०० टक्के लाभ शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

अनाथ मुलांना योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लागू राहील, असेही त्यांनी सांगितले.

अनाथ मुला-मुलींना सामाजिक आरक्षणातून त्यांच्या सामाजिक प्रवर्गाच्या शिष्यवृत्ती योजनेचा किंवा अनाथ आरक्षणाअंतर्गत शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क याकरिता १०० टक्के लाभ या योजनेचा लाभ त्यांच्या ऐच्छिक विकल्पानुसार घेता येईल. तथापि, दोन्ही योजनेंचा लाभ एकाच वेळी घेता येणार नाही. शिक्षण शुल्काअंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधा शिक्षण संस्थेमार्फत अनाथ विद्यार्थ्यास उपलब्ध करून देण्यात येतील.

अनाथांसाठी आरक्षणः शासकीय, निमशासकीय तसेच शासकीय अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी १% आरक्षण लागू करण्यात आले आहे.

अनाथांना दिव्यांगाच्या धर्तीवर शिक्षण व शासकीय (निमशासकीय तसेच शासन अनुदानित संस्थांमधील) पद भरतीमध्ये उपलब्ध पदांच्या १ टक्का इतके आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी


Previous Post

कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी ; राज्यभरातील फुलउत्पादक शेतकऱ्यांचे आझाद मैदानावर तीव्र आंदोलन

Next Post

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृत्रिम वाळूचे ५० क्रशर्स देणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Natural sand and artificial sand

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृत्रिम वाळूचे ५० क्रशर्स देणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

Pawana Dam Update । पवना धरणात २७ टक्के पाणीसाठा ; ‘या’ तारखेपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक

May 25, 2026
Maval Taluka Congress party demands strict action against culprits in NEET paper leak case

नीट (NEET) पेपर लीक प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मावळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाची मागणी

May 25, 2026
Forced sale of non-subsidized fertilizers along with subsidized fertilizers stopped Agriculture Minister Dattatreya Bharane

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीने होणारी विक्री बंद

May 25, 2026
Concrete decisions to accelerate Lonavala Sky Walk project joint meeting of MLA Sunil Shelke District Collector PMRDA Commissioner

आमदार शेळके, जिल्हाधिकारी आणि PMRDA आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाला गती देण्यासाठी ठोस निर्णय

May 24, 2026
Draft electoral roll voting list

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

May 24, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

May 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.