हॅण्ड इन हॅण्ड इंडिया, तळेगाव दाभाडे आणि सहासंखा यांच्या मार्फत केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सामाजिक सुरक्षा योजना व इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स याविषयी जाणीव जागृती कार्यक्रम देहू (तालुका – हवेली, जिल्हा -पुणे) येथे आयोजित करण्यात आला. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबिवल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत पुरेशी जाणीव जागृती नसल्यामुळे, योजना पात्र लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमामार्फत पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ( From Hand in Hand India social organization Social Security Scheme Awareness Program at Dehu )
देहू गावातील सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना, ई – श्रम कार्ड, सुकन्या समृध्दी योजना, इत्यादी विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. सदर सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमामध्ये 40 महिलांनी उपस्थिती नोंदवली. त्यामध्ये मोहन संपतराव कोंडेकर, सुरेखा बबन जोडगे आणि इतर महिला उपस्थित होत्या.
सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य समन्वयक- परमेश्वर ज. कांबळे, प्रकल्प व्यवस्थापक- ओमकार कुलकर्णी, क्षेत्रीय समन्वयक- सौ. सारिका शिंदे, पंढरीनाथ बालगुडे इत्यादी उपस्थित होते. संस्थेकडून महाराष्ट्र राज्य समन्वयक परमेश्वर ज. कांबळे यांनी उपस्थित मान्यवर आणि महिलांचे आभार मानले. ( From Hand in Hand India social organization Social Security Scheme Awareness Program at Dehu )
हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेबद्दल…
हॅन्ड इन हॅन्ड इंडिया ही एक सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे, मागील आठ वर्षापासून पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये महिला बचत गट सक्षमीकरण, महिला कौशल्य विकास आणि उद्योग निर्मिती , नैसर्गिक संसाधने विकास अश्या विविध सामाजिक विषयावर गरिबी निर्मूलन व रोजगार निर्मितीचे कार्य करत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा
– पवना बंदिस्त जलवाहिनीचे काम सुरु करा, भाजपच्या आमदाराची विधानसभेत मागणी, वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता!
– रस्त्याच्या बाजूला त्याला पाण्यात काहीतरी दिसले, निरखून पाहिले तेव्हा शॉकच बसला! 15 फुटी अजगर मस्तपैकी…
– सत्तेत गेल्यावर आमदार सुनिल शेळकेंनी मावळसाठी आणला तब्बल 39 कोटींचा निधी; पाहा होणाऱ्या कामांची यादी