आमदार सुनिल शेळके यांनी मावळ तालुक्यातील विद्युतविषयक विविध कामांसाठी 5 कोटी 62 लाख 12 हजार एवढा निधी मंजूर झाल्याची माहिती समाज माध्यमांवर टाकली होती. त्या पार्श्वभूमीवर मावळचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य बाळा भेगडे यांनी तालुक्याला 5 कोटी 62 लाख रुपयांचा निधी नाही तर साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले. तसेच, आमदारांना मंजूर कामांची बेरीजही जमत नसल्याचा टोला यावेळी बाळा भेगडे यांनी लगावला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागील महिन्यात तालुक्यातील विद्युत विभागाच्या कामाकरिता सुमारे 10 कोटी रुपयांची मागणी केली असता प्रामुख्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मावळ तालुक्याला 7.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती भेगडे यांनी दिली. ( fund approved by Pune District Planning Committee to Maval Taluka Electricity work Verbal conflict between MLA Sunil Shelke and Bala Bhegade )
हेही वाचा – ‘ज्या वाडी-वस्तीवर अद्याप वीज नाही तिथे वीज पोहचवा’, महावितरणच्या अधिकाऱ्यांना आमदार शेळकेंच्या सुचना, वाचा
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२२ -२३ सामान्य विकास विभाग सुधारणा अंतर्गत आपल्या मावळ तालुक्यातील विद्युत विभागाच्या सुमारे ५ कोटी ६२ लक्ष १२ हजार रु.च्या कामांना मान्यता मिळाली.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांचे मन:पूर्वक आभार! pic.twitter.com/iQtnyYpKph— Sunil Shelke (@shelkesunilanna) April 7, 2023
तालुक्याला निधी मंजूर झालेली विकासकामे;
श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या विद्युत कामासाठी 1 कोटी 39 लाख 48 हजार रुपये, यासह तालुक्यातील सोमाटणे, सांगवडे, साळुंब्रे, धानगव्हाण,उर्से, राजपुरी, कामशेत, कल्हाट, वडगाव (मावळ), ब्राम्हणोली, सांगीसे, आढे, काले, चावसर, थुगाव, कोथुर्णे बऊर, पुसाणे, ठाकुरसाई, शिळिंब, चिखलसे, नाणे, इंदोरी, उकसान, आढले, कशाळ, जांबवडे, भोयरे, जांभुळ, चांदखेड, कडधे, गहुंजे आदी गावांतील विद्युतविषयक विकासकामांसाठी निधी मंजुर झाला, अशी माहिती बाळा भेगडे यांनी दिली.
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळेगाव दाभाडे शाखेचा नूतनीकरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
– हनुमान जयंती आणि काळभैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त टाकवे खुर्द गावात पार पडली भव्य छकडी स्पर्धा