शरद मोहोळ हत्या प्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी आज (शनिवार, दि. 6 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन खुनाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले, की मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर हा 25 दिवस शरद मोहोळ याच्या सोबतच फिरत होता. काल अचानक त्याने शरद मोहोळ घरातून बाहेर पडल्यावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर गोळ्या झाडल्या. आरोपी मोहोळ सोबत राहून पोळेकर त्याच्यावर लक्ष ठेवत होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर (रा. सुतारदरा) आणि इतर 2 साथीदारांनी गोळ्या घालत मोहोळचा खून केला. घटनेनंतर हे 3 आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. मुख्य आरोपी पोळेकर हा शरद मोहोळ सोबत अनेक दिवसांपासून सोबत फिरत होता. जेणेकरून मोहोळ याला साहीलवर संशय येणार नाही. आरोपीना शोधण्यासाठी गुन्हे शाखेकडून तपासासाठी 8 पथक तयार करण्यात आली होती. शहरातील सर्व रस्ते बंद करत नाकाबंदी करण्यात आली होती. आरोपी खेड शिवापूर टोलनाक्याजवळ लपून बसले होते. आरोपींच्या गाडीत एकूण 8 जण होते. तर त्यामध्ये दोन वकिलांचा देखील समावेश आहे. ( gagster sharad mohol murder case 8 accused arrested Pune News )
नामदेव महिपती कानगुडे आणि मारुती विठ्ठल गांदले या दोघांचे शरद मोहोळ याच्यासोबत वाद होते. नामदेव कानगुडे हा मुख्य आरोपी पोळेकर याचा मामा असल्याचे समोर आले आहे. या जुन्या वादामुळेच हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आरोपींकडून मिळाली आहे. खुनात एकूण 8 आरोपी सामील असून त्यातील दोन वकील असल्याचेही समोर आले आहे. या वकिलांचा गुन्ह्यांमध्ये नेमका रोल काय? याचा तपास आम्ही सुरू करत आहोत असे रामनाथ पोकळे यांनी सांगितले.
जमीनीच्या वादातून खून –
जमीन आणि पैशांच्या जुन्या वादातून आरोपींनी मोहोळ याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पुणे पोलिसांनी रात्री उशिरा यासंदर्भात माहिती दिली. शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी गोळीबार करून आरोपी पसार झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना मोहोळ याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रं 2/23 भारतीय दंड संहिता कलम 302, 307, 34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1),(3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याच्या तपासात पुणे शहर गुन्हे शाखेची 9 तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती. त्या दरम्यान पुणे-सातारा रोडवर किकवी – शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड व 2 चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. सदरचा गुन्हा हा शरद मोहोळ बरोबर असलेल्या जमिनीच्या पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी केला असल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले.
अधिक वाचा –
– वडगांव शहरातील 300 नागरिकांनी घेतला विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग । Viksit Bharat Sankalp Yatra
– अवघ्या 7 दिवसात संजोग वाघेरेंनी जिंकला उद्धव ठाकरेंचा विश्वास! पक्षाकडून मावळ लोकसभेची मोठी जबाबदारी । Maval Lok Sabha
– गोरगरिबांना दिलासा! जन्म-मृत्यू नोंदीसाठीची फरफट थांबणार, आता तहसीलदारांना मिळालेत जन्म मृत्यू नोंदीचे अधिकार