शासकीय योजना या सामन्यांसाठी असतात. परंतू त्यांचे लाभ घेण्यासाठी नागरिकांना अगोदरच खुप द्रविडीप्राणायम करावे लागतात. यात पैसा आणि वेळ नाहक खर्ची होतात. परंतू कामशेतमध्ये पवनानगर रोडवर गणेश काजळे यांच्या माध्यमातून ‘आपले सरकार नागरी सुविधा केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. ह्या नागरिक ई-सुविधा केंद्रात ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर सामान्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे. ( Ganesh Kajle E Suvidha Kendra Kamshet Maval Taluka )
ईसुविधा केंद्रातच मिळणार पीएमपीएमएल बसचे पास
मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना PMPML बस पाससाठी लागणारे ओळखपत्र – बस पास या ई-सुविधा केंद्रात अर्थात कामशेतमध्ये मिळणार आहेत. यासाठी आधार कार्ड (वय वर्ष 60 पूर्ण असावे), पॅन कार्ड, पत्ता पुरावा (लाईट बिल, रेशन कार्ड ) या कागदपत्रांची आवश्यकता आहे. तसेच पीएमपीएमएल बसचे पाससह जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग यांच्या वतीने मिळत असणाऱ्या योजनांसाठीचे अर्ज आणि सर्व पेपर, अंध अपंग निराधार आणि श्रावणबाळ योजना, वडगाव इथे न जाता काही महत्वाचे अर्ज दाखले, तसेच मंजुरी पत्रक इथे मिळण्याची सोय झाली आहे. ह्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कामशेत शहर महिला आघाडी अध्यक्षपदी ‘यांची’ निवड, इंदोरी इथे कलश पूजन आणि पंचप्राण शपथ कार्यक्रम
– महाराष्ट्र सरकारच्या कृषि पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना : जाणून घ्या योजनेची माहिती आणि संपूर्ण प्रक्रिया
– पवना धरण फुल्ल, तरीही पिंपरी-चिंचवड शहराला होतोय दिवसाआड पाणीपुरवठा, ‘हे’ आहे कारण