पिंपरी चिंचवड शहरासाठी जलस्त्रोत असलेले पवना धरण शंभर टक्के भरले आहे. साधारण दीड आठवड्यापूर्वी पवना धरण शंभर टक्के भरले, तसेच पवनाधरण पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरुच असतो. असे असूनही पिंपरी चिंचवड शहरवासियांना पाण्याचा पुरवठा मात्र दिवसआडच होतो आहे. शहरवासियांवरील पाणीकपातीचे ग्रहण काही सुटलेले नाही. परंतू धरण भरलेले असतानाही दिवसआड पाणीपुरवठा का, हा प्रश्न उपस्थित होतो आहे. ( Pavana Dam 100 percent full Pimpri Chinchwad city is getting water supply day by day )
दिवसआड पाणी पुरवठा होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे, यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने उन्हाळ्यात स्थिती कशी राहील? याबाबत प्रशासन सतर्क झाले आहे. पवना धरण भरले असले तरी शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. वर्षभर पिण्याचे पाणी पुरेल अशा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, पवना धरण शंभर टक्के भरले असल्याने आता तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र, शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची अडचण होणार आहे. कारण पावसाने ओढ दिली असून संभाव्य पाणीटंचाईसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.
पावसाने दिलीये ओढ….
मावळच्या ग्रामीण भागात पावसाने ओढ दिल्यास ग्रामीण भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरठ्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोशी, चऱ्होली, दिघी, आळंदीरस्ता, चिखली, तळवडे, ताथवडे, किवळे, विकासनगर, वाकड परिसरात गृहनिर्माण सोसायट्यांना टँकरने पाणी घ्यावे लागत आहे. सध्या समाधानकारक पाऊस झाला असला तरीही पावसाने आणखी ओढ दिल्यास पाणीटंचाईचा सामना करावा लागणार. मात्र, पिण्याच्या पाण्याची समस्या नसेल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा, राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा; खासदार बारणेंचा पाठपुरावा यशस्वी
– दैनिक मावळ बुलेटीन : वाचा मावळ तालुक्यातील महत्वाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
– मराठा समाजाचा निर्णय घेता येत नसेल तर सत्तेत तरी कशाला बसता?