पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे विद्यमान उपाध्यक्ष गणेश दत्तात्रय शेडगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल महाराष्ट्र प्रदेशच्या पुणे कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग सेल महाराष्ट्र प्रदेश चे राज्यप्रमुख सुहास तेंडुलकर यांनी गणेश शेडगे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. ( Ganesh Shedge appointed as Pune Working President of Nationalist Congress Party Divyang Cell Maharashtra Pradesh )
मावळ तालुक्यातील संघटन मजबूत करुन दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी गणेश शेडगे हे मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षात कार्य करत आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांनुसार आणि अजित पवार, सुप्रिया सुळे आदी नेतृत्वांच्या सोबत पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून सर्वसामान्य दिव्यांगांच्या विकासात भरीव कार्य करण्याची अपेक्षा त्यांच्याकडून पक्षाने व्यक्त केली आहे.
अधिक वाचा –
– मावळ तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी सोमनाथ कालेकर तर उपाध्यक्षपदी विठ्ठल पाठारे; पाहा संपूर्ण कार्यकारिणी
– छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या सरदार चिमणाजी देशपांडे यांच्या वडगावमधील समाधीची दुरावस्था, शिवभक्तांची ‘ही’ मागणी