Dainik Maval News : टाकवे बुद्रूक, कान्हे फाटा, वडेश्वर आदी ठिकाणी विद्युत रोहित्रांतील तांब्याच्या तारांच्या चोरीचे गुन्हे केलेल्या टोळीला पकडण्यात वडगाव मावळ पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 78 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा व कॉईल असा जवळपास 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रमेश बाळू पडवळ (वय 27 वर्षे), सुनील उर्फ सैराट शिवाजी गावडे (वय 29 वर्षे, दोन्ही रा. निमगाव दावडी, ता. खेड, जि. पुणे), रवींद्र सुरेश गावडे (वय 24 वर्षे, रा.खडकी, पिंपळगाव, ता. आंबेगाव, जि.पुणे), सुनील सुरेश गावडे (वय 23 वर्षे, रा. खडकी पिंपळगाव, ता.आंबेगाव, जि. पुणे) व चोरीचा माल विकत घेणारा भंगार दुकानदार बैदुल अब्दुल्ला चौधरी (वय 42 वर्षे, रा. कान्हे मावळ, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ( Gang of stealing wires from electrical appliances arrested by Vadgaon Maval police )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 20 जुले रोजी टाकवे गावच्या हद्दीत अमित विजयकुमार पोखरणा यांच्या जागेमध्ये असलेला 63 केव्हीचा रोहित्र अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केल्याची तक्रार वडगाव मावळ पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. तसेच वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वीही रोहित्रांतील तांब्याच्या तारांच्या चोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे, नागरिक आणि शेतकरी यांच्यात चिंतेचे वातावरण होते.
त्याअनुषंगाने गुन्ह्यातील टोळीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी पोलीस अंमलदारांचे एक पथक तयार केले. त्यात उपनिरीक्षक सुनील जावळे, अजित ननावरे, सचिन गायकवाड, सचिन काळे, शशिकांत खोपडे आदींचा समावेश होता.
सदर तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण करून रोहित्रांमधील तारा चोरण्याच्या स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींची पडताळणी करत असताना त्यांना वरील टोळीची माहिती प्राप्त झाली. सदर आरोपींना म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यामुळे आरोपींना रितसर ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळवून तपास केला असता त्यांनी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. तसेच यातील माल भंगार दुकानदार बैदुल अब्दुल्ला चौधरी याला विकल्याचे सांगितले.
अधिक वाचा –
– रेड्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मावळातील कुसगाव येथील घटना, कुटुंबीयांना शोक अनावर । Maval News
– आता प्रत्येक शाळा, कॉलेजसाठी पोलीस अधिकारी, अंमलदार यांची नियुक्ती ; आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची सुचना
– साखर कारखान्यांना सहकारी बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी आता संपूर्ण संचालक मंडळावर