Dainik Maval News : गणपती बाप्पाला निरोप देताना पिता-पुत्रावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी आणि दुःखद घटना मावळ तालुक्यात घडली आहे. अवैध उत्खनन केलेल्या खाणीत गणपती बुडवताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बाप लेकाचा बुडून मृत्यू झाला आहे. बेडसे इथे घरघुती बाप्पाचं विसर्जन करताना गुरुवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संजय धोंडू शिर्के आणि आदित्य संजय शिर्के अशी बुडून मृत्यू झालेल्या बाप लेकांची नावे आहेत. वन्यजीव रक्षक आणि आपदा मित्र मावळ या रेस्क्यू टीमच्या मदतीने दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या पथकाच्या वतीने रात्री दीड वाजेपर्यंत पाण्यात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले. बाप लेकाचा मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ( Ganpati Immersion Procession Father son drowned in Maval taluka )
- मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सर्वत्र गणरायाला भक्तिभावात निरोप देण्यात येत होता. यावेळी बेडसे गावातील संजय धोंडू शिर्के आणि आदित्य संजय शिर्के हे आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी घराजवळच्या खाणीवर गेले होते. यावेळी आरती झाल्यानंतर मोठ्या भक्तीभावाने बाप्पाला निरोप देण्यात येत होता. बाप्पाला घेऊन आदित्य हा पाण्यात गेला होता. मात्र तो बराच वेळ झाला तरी, पाण्यातून वर न आल्यानं त्याचे वडील संजय शिर्के यांनी पाण्यात उडी घेतली.
बाप्पाला घेऊन पाण्यात गेलेला आदित्य बराच वेळ झाल्यानंतरही वर न आल्यानं त्याचे वडील संजय शिर्के यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र संजय शिर्के यांनी उडी घेतलेल्या ठिकाणी अवैध उत्खनन करण्यात आल्यानं त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. लेकाला वाचवायला गेलेले संजय शिर्के हे देखील पाण्यातून वर आले नाही. त्यामुळे या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारकी पसरली.
घटनेची माहिती तत्काळ कामशेत पोलीस ठाण्यात कळवण्यात आली. त्यानंतर वन्यजीव रक्षक आणि आपदा मित्र मावळ या रेस्क्यू टीमच्या मदतीनं दोघांचा पाण्या शोध घेण्यात आला. यावेळी अथक परिश्रमानंतर या बचाव पथकाला संजय शिर्के आणि आदित्य शिर्केचा मृतदेह शोधण्यास रात्री उशीरा यश आलं. या प्रकरणी कामशेत पोलिसांनी आकस्मीत मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच, पवना धरणाने गाठली शंभरी, लोणावळ्यात आतापर्यंत ५४७७ मीमी पाऊस
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार – आमदार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक । Dehu Road News
– सणासुदीच्या काळात अखंड वीज पुरवठ्यासाठी ‘महावितरण’ने दक्षता घ्यावी – खासदार श्रीरंग बारणे । Pimpri Chinchwad