व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार – आमदार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक । Dehu Road News

केंद्र व राज्य शासन तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील प्रश्न सोडवणार - खासदार बारणे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 8, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Dehu Road Cantonment Board

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील विविध कामांचा आढावा घेण्यासंदर्भातील बैठक खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. निधी अभावी प्रलंबित असलेली देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कामे केंद्र व राज्य शासन तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील विविध विकासकामे व समस्या याबाबत आढावा घेण्यासाठी खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी बारणे बोलत होते. बैठकीला आमदार सुनिल शेळके, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर अमन, कटोच, मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत, सदस्य प्रशासक कैलास पानसरे, कार्यालय अधीक्षक लक्ष्मण तनपुरे, अभियंता टोनी अँथनी, गिरीधर शर्मा, राजस्व विभागाचे सुनील गुरव, भांडार प्रमुख वीरेंद्र घोडेकर आदी उपस्थित होते. ( review meeting in presence of MP Barne MLA Shelke regarding pending issues in Dehu Road Cantonment Board )

देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याच्या प्रस्तावात सुरुवातीला देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचाही समावेश होता. मात्र संरक्षण विभागाच्या दृष्ट्या महत्त्वाचे असल्यामुळे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त न करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगातून‌ कॅन्टोन्मेंट बोर्डांना निधी मिळत असे, मात्र निधी अभावी अनेक कामे प्रलंबित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) माध्यमातून आपण स्वतः तसेच आमदार सुनील शेळके मिळून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला राज्य शासनाचा निधी उपलब्ध करून देऊ. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांशी चर्चा करून महापालिकेच्या माध्यमातून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील काही कामे करता येतील का, याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असे बारणे यांनी सांगितले.

  • देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून संत तुकाराम महाराज पालखी जाते. हा पालखी मार्ग विकसित करण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. काळोखे मळ्याकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची दूरवस्था झाल्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीलगत असलेल्या सिद्धिविनायक नगरीतील पाणी, रस्ते व ड्रेनेजच्या कामांसाठी डीपीडीसीतून निधी मिळवून देण्यात यावा. पिंपरी-चिंचवड महापालिकेने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत विद्युतदाहिनीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या ठिकाणी नागरिकांना अधिक सुविधा देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत काही ठिकाणी सांडपाणी पवना नदीत जाऊन मिळत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे सहकार्याची मागणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. देहूरोड मधील स्वच्छता, डेंग्यूचे रुग्ण यासह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– राज्यातील अंगणवाडी केंद्रांना सोलर सिस्टिम देणार, शिंदे सरकारचा निर्णय, 36 हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार
– कामशेतमधील मुस्लीम दफनभूमीस संरक्षण भिंत बांधण्यासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध । Kamshet News
– लोणावळा नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

सणासुदीच्या काळात अखंड वीज पुरवठ्यासाठी ‘महावितरण’ने दक्षता घ्यावी – खासदार श्रीरंग बारणे । Pimpri Chinchwad

Next Post

मावळ तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच, पवना धरणाने गाठली शंभरी, लोणावळ्यात आतापर्यंत ५४७७ मीमी पाऊस

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Rain

मावळ तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच, पवना धरणाने गाठली शंभरी, लोणावळ्यात आतापर्यंत ५४७७ मीमी पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Teachers

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

June 28, 2026
Threatening of journalists by public representatives will not be tolerated Maval Taluka Marathi Journalists' Association

लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांना धमकावणे खपवून घेणार नाही ; मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन

June 28, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

आमदार सुनील शेळके यांच्या मागणीला यश ; केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश

June 28, 2026
Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.