Dainik Maval News : वडगांव नगरपंचायत हद्दीतील सर्व १२ अंगणवाडी येथील सर्व ४५५ विद्यार्थी विद्यार्थिनींना मावळ विचार मंच , जैन संघ आणि लायन्स क्लब ऑफ वडगांव यांच्या माध्यमातून उबदार स्वेटर भेट देण्यात आले.
मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते, मावळ विचार मंचाचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, लायन्स क्लब ऑफ वडगांव चे संस्थापक अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, अध्यक्ष प्रशांत गुजराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला.
वडगांव गांवठाण, मधुबन, भिलारे वस्ती, मोरया कॉलनी, ठाकर वाडी, मिलिंद नगर, श्री खंडोबा मंदिर जवळ, केशव नगर, बाजारपेठ, चव्हाण वाडा, माळी नगर, कातवी या वडगांव नगरपंचायत हद्दीतील सर्व १२ अंगणवाडी मधील सर्व ४५५ विद्यार्थी विद्यार्थिनींना या उबदार स्वेटर ची भेट देण्यात आली. सर्व अंगणवाडी मदतनीस तसेच पालक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते. स्वेटर ची भेट मिळाल्यामुळे मुलांच्या चेहेऱ्यावर आनंद व्यक्त होत होता.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी सरस्वती व्याख्यानमाला या माध्यमातून समाजाला विचाराचे संस्कार देत असताना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस देखील या लहान मुलांना नव राष्ट्र निर्मितीचे संस्कार देत आहेत आणि सकारात्मक पिढी घडवत आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
श्री पोटोबा देवस्थान संस्थान अध्यक्ष किरण भिलारे, ॲड दामोदर भंडारी, नगरसेवक प्रवीण चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
अंगणवाडी सेविका प्रतिभा ढोरे , कांचन ढोरे, कल्पना ढोरे, छाया धोंगडे, अर्चना ढोरे, कमल शिंदे, चेतना ढोरे, हर्षा ओव्हाळ, सुमित्रा ढवळे, शालन कावडे, शकुंतला नागे, मंदा चव्हाण यांनी नियोजन केले. स्वागत प्रतिभा ढोरे यांनी केले सूत्र संचालन माजी नगरसेवक भूषण मुथा यांनी केले, आभार प्रदर्शन उपाध्यक्ष संतोष भालेराव यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार शेळकेंना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी द्यावी ; मावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अजितदादांकडे मागणी
– चार वाहनांमधून तब्बल 95 जनावरांची वाहतूक, दहा जणांवर गुन्हा दाखल, उर्से टोलनाक्याजवळील घटना । Maval News
– मावळात सर्वदूर थंडीची लाट… ग्रामीण भागात सर्वाधिक गारठा । Maval News