Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी (दि. ५ मे) जाहीर झाला आहे. यंदा बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल ९१ टक्के इतका लागला असून, परीक्षेला बसलेल्या १४ लाख विद्यार्थ्यांपैकी १३ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मुलींनीच बाजी मारली आहे.
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या बारावीच्या निकालातही मुलींचाच डंका वाजला आहे. कॉलेजच्या निकालात विज्ञान शाखेचा निकाल ९८.६० टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ८९ टक्के, कला शाखेचा निकाल ७३.३३ टक्के इतका लागला असून तंत्रशिक्षण शाखेचा निकाल ९७.६७ टक्के लागला आहे.
इंद्रायणी विद्यालयाचा शाखा निहाय :
विज्ञान शाखा
१) मिताली संजय फडतरे – ९४.८३ टक्के
२) उन्नती राजेश ठाकूर – ९२.८३ टक्के
३) आकांक्षा पोपट दाभाडे – ८९.५० टक्के
वाणिज्य शाखा
१) जाधव श्रुतिका विकास – ९०.५ टक्के
२) गोपाळे श्रुती प्रकाश – ८८ टक्के
२) काशीद कृष्णराज धनंजय – ८८ टक्के
३) गरुड मयुरा अमोल – ८४.१७ टक्के
कला शाखा
१) बोरे कुंदन संदीप – ८६.१७ टक्के
२) चिलप मयुरी निलेश – ७७.६७ टक्के
३) वाघमारे कोमल राजेभाऊ – ७५.३३ टक्के
तंत्रशिक्षण विभाग
१) होटकर विनायक मल्लिकनाथ – ७६.३३ टक्के
२) माळी अथर्व अप्पासाहेब – ६७.८३ टक्के
३) अंकुशी प्रदीप प्रकाश – ६६.८३ टक्के
विशेष प्राविण्यासह प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उप प्राचार्य प्रा.संदीप भोसले आणि सर्व संस्था पदाधिकारी आणि शिक्षकांनी अभिनंदन केले.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.१० टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, १२ कॉलेजचा निकाल शंभर टक्के । Maharashtra HSC 12th Result 2025
– ‘दैनिक मावळ’ संवाद : ज्येष्ठ नाट्यकलाकार व नाट्यप्रशिक्षक प्रकाश पारखी यांच्याशी खास बातचीत । Drama instructor Prakash Parkhi
– पुणे-लोणावळा तिसर्या-चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पुढे जाणार, रेल्वेकडून डीपीआर तयार ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती