Dainik Maval News : मावळ तालुक्यातील हजारो शेतकरी, नागरिक आणि पिंपरी-चिंचवड शहर वासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मावळसह पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणारे आणि उद्योगधंद्यांना पाणीपुरवठा करणारे पवना धरण 98 टक्के भरले आहे. काही दिवसांपासून पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. परंतू डोंगराळ भागातून वाहणारे ओढे प्रवाहित असल्याने पाण्याची आवक सुरू आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शनिवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळे वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता जवळपास मिटली आहे. मागील 24 तासात पवना धरण परिसरात 32 मीमी पाऊस झाला. यासह चालू हंगामात अर्थात 1 जूनपासून 2468 मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. तसेच पवना धरण आता 97.17 टक्के भरल्याची नोंद शनिवारी सकाळी घेण्यात आली होती. धरण काठोकाठ भरल्याने आणि पाण्याची आवक सुरू असल्याने पुन्हा एकदा धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या 800 क्युसेक विसर्ग होत आहे. ( Good news Pavana dam filled to the brim discharge from the dam resumes )
अधिक वाचा –
– कुणी जागा देतं का जागा ? घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी टाकवे ग्रामस्थांना जागेची अडचण, निधी आहे पण…
– क्रांती दिनी, भिडले राजकारणी ; श्रद्धांजलीच्या पावसात, राजकारण जोरात
– तयारी विधानसभा निवडणूकीची : संपूर्ण पुणे जिल्ह्यात ८४ लाख मतदार ; पाहा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेतील मतदारसंख्या । Vidhansabha Election 2024