Dainik Maval News : राज्य शासनाने शैक्षणिक वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील विद्याध्यर्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मोफत आणि सुलभपणे उपलब्ध होणार आहे. परिणामी, जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा कल लक्षणीय वाढला असून, अनेक शाळांची पटसंख्यादेखील वाढली असल्याने झेडपी शाळांना नवचैतन्य प्राप्त झाले आहे.
- पहिल्या टप्प्यात पहिलीसाठी सीबीएसई अभ्यासक्रम योजना टप्प्याटप्प्याने अंमलात आणण्यात येणार असून, २०२५-२६ या वर्षात फक्त इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्येकवर्षी पुढील इयत्तांमध्ये हा अभ्यासक्रम वाढवण्यात येणार आहे. सीबीएसई पॅटर्न स्वीकारताना, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि मराठी भाषासुद्धा असणार आहे.
अंमलबजावणी पुढीलप्रमाणे
२०२५-२६ : इयत्ता १ ली, २०२६-२७ : इयत्ता २ री, ३ री, ४ थी व ६ वी, २०२७-२८ : इयत्ता ५ वी, ७ वी, ९ वी व ११ वी, २०२८-२९ : इयत्ता ८ वी, १० वी व १२ वी
सीबीएसई पॅटर्नची वैशिष्ट्ये
सीबीएसई अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आकलन व विश्लेषण क्षमतेत लक्षणीय वाढ होते. हा अभ्यासक्रम संकल्पनाधिष्ठित व कौशल्यविकासावर आधारित असल्याने विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतो. त्यामुळे पालकांकडून सीबीएसई पेंटर्नला मोठी पसंती मिळत आहे.
दोन अभ्यासक्रम निवडण्याचा पर्याय खुला
जरी शिक्षणपद्धती सीबीएसई पेंटनंबर आधारित असली तरी इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षा राज्य मंडळामार्फतच घेण्यात येणार आहेत. पालक व विद्यार्थ्यांना राज्य मंडळ किंवा सीबीएसई यापैकी कोणताही अभ्यासक्रम निवडण्याचा पूर्ण पर्याय खुला असणार आहे.
शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण
सीबीएसई पद्धतीनुसार प्रन्नपत्रिकांची रचना अधिक विचारप्रवण व संकल्पनात्मक असते. त्यामुळे शिक्षकांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. जेणेकरून विद्यार्थी अधिक सखोल व समजून घेण्यावर आधारित शिक्षण घेऊ शकतील. या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा नव्या उंचीवर पोहचण्याची आशा व्यक्त होत आहे.
“सीबीएसईमुळे पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घड्यास मदत होईल. हा अभ्यासक्रम केवळ पाठांतरावर आधारित नसून, तो मुलांच्या विचारशक्ती, विश्लेषण क्षमतेला चालना देणारा असेल. ग्रामीण भागातही राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे, हीच शासनाची भूमिका असून शिक्षक म्हणून आम्हालाही हे एक नवे आव्हान आणि संधी दोन्ही आहे.” – रुपाली गायकवाड, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टाकवे बुद्रुक
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शिष्यवृत्ती परीक्षेत टाकवेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश ; दोन विद्यार्थिनींना जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान । Maval News
– महत्वाचा निर्णय ! पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत
– देहूरोड कॅन्टोन्मेंट भागातील विकासकामांसाठी विशेष निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ; पालखी मार्गाच्या विकासाची घोषणा
– महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय ! ‘गणेशोत्सव’ महाराष्ट्र राज्याचा अधिकृत ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित