राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांचा धुरळा उडाला आहे. मावळ तालुक्यात एकूण 29 ग्रामपंचातींसाठी निवडणूक होत आहे. यात 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका तर 10 ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूका होत आहेत. शुक्रवारी (दिनांक 20 ऑक्टोबर) हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक होता. त्यामुळे वडगाव मावळ इथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि समर्थकांची मोठ्ठी गर्दी झाली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यात सरपंच पदाच्या 21 जागांसाठी 117 तर सदस्य पदाच्या 169 जागांसाठी 462 अर्ज आलेत
- डोने – सरपंच पदासाठी 9 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 26 अर्ज
- आढले – सरपंच पदासाठी 1 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 9 जागांसाठी 11 अर्ज
- बेबेड ओहोळ – सरपंच पदासाठी 4 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 11 जागांसाठी 35 अर्ज
- सुदुंब्रे – सरपंच पदासाठी 8 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 11 जागांसाठी 39 अर्ज
- सुदवडी – सरपंच पदासाठी 7 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 20 अर्ज
- जांबवडे – सरपंच पदासाठी 8 अर्ज. सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 19 अर्ज
- मळवंडी ढोरे – सरपंच पदासाठी 7 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 20 अर्ज
- भाजे – सरपंच पदासाठी 4 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 9 जागांसाठी 29 अर्ज
- सांगिसे – सरपंच पदासाठी 7 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 38 अर्ज
- आंबळे – सरपंच पदासाठी 8 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 9 जागांसाठी 28 अर्ज
- कल्हाट – सरपंच पदासाठी 5 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 24 अर्ज
- कोंडीवडे अ.मा. – सरपंच पदासाठी 6 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 11 अर्ज
- साळुंब्रे – सरपंच पदासाठी 5 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 26 अर्ज
- उदेवाडी – सरपंच पदासाठी 4 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 10 अर्ज
- लोहगड – सरपंच पदासाठी 2 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 16 अर्ज
- शिळींब – सरपंच पदासाठी 10 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 27 अर्ज
- मुंढावरे – सरपंच पदासाठी 3 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 9 जागांसाठी 32 अर्ज
- दिवड – सरपंच पदासाठी 7 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 9 जागांसाठी 29 अर्ज
- ओवळे – सरपंच पदासाठी 10 अर्ज, सदस्य पदाच्या एकूण 7 जागांसाठी 20 अर्ज
पोटनिडणुका असलेली गावे आणि उमेदवारी अर्ज
- चिखलसे – सदस्य पदाच्या 1 जागेसाठी 1 अर्ज (बिनविरोध)
- नवलाख उंब्रे – सदस्य पदाच्या 1 जागेसाठी 2 अर्ज
- पुसाणे – सरपंच पदासाठी 1 अर्ज, सदस्य पदाच्या 7 जागांसाठी 7 अर्ज (बिनविरोध)
- सावळा – सदस्य पदाच्या 1 जागेसाठी 1 अर्ज (बिनविरोध)
- कान्हे – सदस्य पदाच्या 1 जागांसाठी 2 अर्ज
- शिवणे – सदस्य पदाच्या 2 जागांसाठी 2 अर्ज (बिनविरोध)
- शिरगाव – सरपंच पदाच्या एका जागेसाठी 1 अर्ज (बिनविरोध)
- दारुंब्रे – सदस्य पदाच्या 3 जागांसाठी 13 अर्ज
- कुसगाव बु. – सदस्य पदाच्या 1 जागेसाठी 8 अर्ज
- खांडशी – सदस्य पदाच्या 1 जागेसाठी 3 अर्ज
अधिक वाचा –
– पुण्यातील 30 ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे’ पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मावळमधील दोन केंद्रांचा समावेश
– आमदार सुनिल शेळकेंची क्रेझच निराळी! गिर्यारोहकांनी वजीर सुळक्यावर फडकवला वाढदिवसाचा बॅनर । MLA Sunil Shelke Birthday
– मावळ-मुळशी उपविभागात ‘इथे’ फटाके उडविण्यास बंदी, जाणून घ्या काय आहे कारण