मावळ तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूकांचा धुराळा उडल्याचे पाहायला मिळत आहे. मावळ तालुक्यात एकूण 29 ग्रामपंचातींसाठी निवडणूका होत आहेत. यात 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका तर 10 ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूका होत आहेत. यातील सार्वत्रिक निवडणूका होत असलेल्या 19 गावांसाठी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीने प्रभारी नेमले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संबंधित प्रभारी हे त्या त्या गावातील नागरिक आणि पार्टीचे कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून निवडणूक व्युवरचना आखतील. तसेच निवडणूक प्रत्येक ग्रामपंचायतीवर भाजपाचाच झेंडा कसा फडकेल, यासाठी काम करतील. ग्रामपंचायत निवडणूकांमधून भाजपाची ताकद पुन्हा एकदा सर्वांना दिसून येईल, अशी माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांनी दिली. भाजपाचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत प्रभारींची यादी अंतिम करण्यात आली. ( Gram Panchayat Election 2023 In Charge Person Appointed By Maval BJP )
निवडणूक असलेली ग्रामपंचायत आणि भाजपाचे प्रभारी;
- साळुंब्रे – रविंद्र भेगडे
- भाजे – गुलाबराव म्हाळसकर
- कल्हाट – शांताराम कदम
- शिळींब – नितीन मराठे
- डोणे – बाळासाहेब घोटकुले
- दिवड – बाळासाहेब घोटकुले
- ओव्हळे – नितीन घोटकुले
- मळवंडी ढोरे – किरण राक्षे
- आढले बु. – दत्ताभाऊ माळी
- बेबडओहळ – धनंजय टिळे
- सुदुंब्रे – मनोहर भेगडे
- सुदवडी – विकास शेलार
- जांबवडे – सुनील चव्हाण
- सांगिसे – अभिमन्यू शिंदे
- आंबळे – रविंद्र शेटे
- कोंडिवडे आं. मा. – रोहिदास असवले
- उदेवाडी – संदीप उंबरे
- लोहगड – विश्वनाथ जाधव
- मुंढावरे – जितेंद्र बोत्रे
अधिक वाचा –
– धक्कादायक! लोणावळ्यात चिक्कीच्या दुकानात शिरला ट्रक
– सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळमधील सोसायटी संचालकांचा ‘सह्याद्री फार्म्स’ इथे अभ्यास दौरा
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण