पवना धरणग्रस्त संयुक्त संघटना व पवना धरणग्रस्त यांच्याकडून मंगळवार, दिनांक 9 मे रोजी सकाळी 10 वाजता प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. पवनानगर काले कॉलनी ते पवनाधरण बंधारा असा मोर्चा काढण्यात येणार आहे. ( Grand march of Pavana Dam victims from Kale Colony to Pavana Dam on 9th May )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“आपल्या हक्काचे पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी आपण सर्वानुमते शासनाच्या विरोधात आंदोलन करत आहोत. यापुर्वी ज्या 340 धरणग्रस्त खातेदारांना प्रत्येकी 4 एकर क्षेत्र देवून शासनाने पुनर्वसन केले आहे, त्याप्रमाणेच उर्वरीत सर्व खातेदारांचे पुनर्वसन करावे आणि इतर विविध प्रमुख मागण्यांकरीता हे आंदोलन आहे. यामध्ये सर्व धरणग्रस्त बंधु/भगिनी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आपले पुनर्वसन करून घेणेकामी ऐतिहासिक लढ्यात सहभागी व्हावे”, असे आवाहन पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेकडून करण्यात आले आहे.
या आंदोलनात पवना धरणग्रस्तांनी सामील व्हावे. तसेच पवना धरणग्रस्त संयुक्त संघटना, धरण विभागातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व सर्व पदाधिकारी यांनी सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– ब्रेकिंग! अखेर शरद पवारांची माघार, पक्षाध्यक्षपदी कायम राहणार, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
– शिरगाव पोलिसांची गावठी दारूच्या अड्ड्यावर कारवाई, 1 लाख 62 हजारांच्या मुद्देमालासह दोन महिला ताब्यात