बेकायदा गावठी दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर शिरगाव पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत 1 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन महिला आरोपींनी अटक करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लक्ष्मण फडतरे (पोलिस कॉन्स्टेबल, शिरगांव परंदवडी पोलीस स्टेशन) यांनी पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार दोन महिला आरोपींवर शिरगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (क), (फ), 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे. ( Shirgaon police action on illegal liquor factory two women detained with goods worth 1 lakh 62 thousand )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी प्राप्त माहितीनुसार दिनांक 4 मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुसगाव गावच्या हद्दीत गुलाब नामदेव गायकवाड यांच्या शेतामध्ये छापा मारला. यावेळी फिर्यादीत नमुद तारिख, वेळी आणि ठिकाणी आरोपी महिला संगनमताने एकूण 1 लाख 62 हजार रूपये किंमतीची बेकायदेशीर गावठी देशी दारू तयार करण्यासाठी गुळ मिश्रित कच्चे रसायन तयार करून त्यापासून गावठी देशी दारू तयार करण्यासाठी हातभट्टी लावण्याच्या उद्देशात असल्याच्या मिळुन आल्या, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस हवालदार पठारे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– आषाढी वारी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी
– ‘यापुढे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर जड वाहने, पर्यटन गाड्यांना लेन कटिंग करु देवू नका’ – खासदार बारणे