राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी अखेर त्यांचा पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे. यापुढे ही शरद पवारच हे अध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत. आता नव्या जोमाने पक्षवाढीसाठी काम करेन, यापुढे सर्वांना विश्वासात घेऊनच पक्षाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील, तसेच मविआवर काहीही फरक पडणार नाही, एकत्रित कामे केली जाणार, असे पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. ( Breaking News Sharad Pawar Withdraws Resignation As NCP President )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच, भाकरी फिरवणार होतो, पण आता भाकरीच थांबली अशी मुश्किल टीपण्णी देखील शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. यासह यापुढे आता नवीन नेतृत्वावर अधिक भर दिला जाईल, अशी माहितीही पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधिक वाचा –
– शिरगाव पोलिसांची गावठी दारूच्या अड्ड्यावर कारवाई, 1 लाख 62 हजारांच्या मुद्देमालासह दोन महिला ताब्यात
– आषाढी वारी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी