मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून सातत्याने तालुक्यातील गावागावात विविध विकासकामे होताना दिसत आहे. यातही जल जीवन मिशन च्या माध्यमाधून तालुक्यातील कानाकोपऱ्यातील गावांत पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाण्याचे प्रश्न मार्गी लागताना दिसत आहे. ( Groundbreaking Of Tap Water Supply Schemes In Amble And Mangalore Villages Of Maval Taluka Under Jal Jeevan Mission )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रविवारी (8 जानेवारी) मावळ तालुक्यातील आंबळे आणि मंगरुळ येथील नळ पाणी पुरवठा योजनांचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
‘जल जीवन मिशन’ अंतर्गत आंबळे पाणी पुरवठा योजनेसाठी 3 कोटी 21 लाख रुपये आणि मंगरूळ योजनेसाठी 1 कोटी 25 लाख रुपये असा एकुण 4 कोटी 46 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या भुमिपूजन समारंभाला आमदार सुनिल शेळकेंसह जेष्ठ मान्यवर, आजी-माजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी,महिला-भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग । कामशेत ते मळवली रेल्वे स्टेशन दरम्यान मालगाडीच्या धडकेत अनोळखी वृद्धाचा मृत्यू
– पुणे जिल्ह्यात एकूण 79 लाख 51 हजार 420 मतदार, मतदार संख्येत तब्बल 74 हजार 470 ची वाढ, वाचा अधिक