मावळ तालुक्यात आणखीन एका अपघाताची घटना समोर आली आहे. शनिवार (दिनांक 7 जानेवारी 2023) रोजी कामशेत ते मळवली रेल्वे स्टेशन दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातात एका अनोळखी वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ( Elderly Man Dies By Hitting Goods Train Near Kamshet to Malavli Railway Station )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, 7 जानेवारी रोजी दुपारी एक वाजण्यापूर्वी मळवली ते कामशेत रेल्वे स्टेशन दरम्यान रे.कि.नं. 137/18-20 DN लाईनवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. वय अंदाजे 75 वर्षे असणाऱ्या या व्यक्तीचा धावती मालगाडी MSTB-CCH ची धडक बसून डोक्यात झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मृत व्यक्तीचे वर्णन – अंगाने सडपातळ, उंची पाच फूट, रंगाने निमगोरा, चेहरा उभट, दात वरचे दोन शाबूत, ओठ – मध्यम आणि वय 75 वर्षे अंदाजे, डोळे काळे, कान मध्यम, नाक सरळ, कपाळ मोठे, दाढी पांढरी वाढलेली, मिशी पांढरी वाढलेली, डोक्याचे केस वरून अर्धवट टक्कल बाजूने बारीक पांढरे
मृत व्यक्तीच्या अंगात नेव्ही ब्लू रंगाचा हाफ स्वेटर, पांढऱ्या रंगाचा फुल भायाचा शर्ट, काळ्या रंगाचे नाईट पॅन्ट, चॉकलेटी रंगाची इनर अशा वर्णनाची व्यक्ती असून वरील वर्णनाच्या बेवारस मृताचे कोणी वारस अथवा व्यक्ती असेल तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस हवालदार एस. ई. सावंत यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पवना डॅममध्ये बुडून शिक्षकाचा मृत्यू
– अपघात ब्रेकिंग । देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ अनोळखी महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू