Dainik Maval News : हिंजवडी येथे एका टेम्पो ट्रॅव्हलर बसला आग लागून चार कामगारांचा मृत्यू झाला. बुधवारी (दि.१९) घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. या दुर्घटनेत मावळ तालुक्यातील दिवड गावातील गुरुदास खंडू लोकरे (वय४२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर चारही कामगारांचे मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) येथे आणण्यात आले. पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना रुग्णालयात बोलावून घेतले. मात्र आपल्या नातेवाईकाचा मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. सदर दुर्घटनेतील मृत पावलेल्या चार जणांपैकी एक व्यक्ती हा मावळ तालुक्यातील दिवड गावातील आहे. यामुळे दिवड गावावर शोककळा पसरली आहे.
लहान मुले झाली पोरकी
गुरुदास लोखरे हे मुळचे मावळ तालुक्यातील दिवड गावातील रहिवासी. परंतु ते मागील काही वर्षांपासून पुण्यातील पौड फाटा येथे स्थायिक झाले होते. ते सात वर्षांपासून कंपनीत हेल्पर म्हणून काम करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, १२ व १० वर्षांची दोन मुले, आई-वडील, भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर ; कारवाईस प्रारंभ
– तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई