Dainik Maval News : लोणावळा शहर आणि भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. लोणावळा शहर परिसरात अतिवृष्टी सुरू असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोबतच शहरातील अनेक भागात पाणीसाठल्याच्या घटना घडल्या असून सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना देखील घडत आहेत. या पार्श्वभूमीवर लोणावळा नगर परिषद हद्दीतील शाळांना दोन दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस दक्षतेचा इशारा देण्यात आला असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा विचारात घेऊन लोणावळा नगरपरिषद क्षेत्रातील शाळांना गुरुवार आणि शुक्रवार अर्थात दिनांक 25 आणि 26 जुलै 2024 रोजी विशेष सुटी जाहीर करण्यात आली आहे.
लोणावळा नगरपरिषद प्रशासक, मुख्याधिकारी अशोक साबळे आणि लोणावळा शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी अशोक पानसरे यांनी हे आदेश काढले आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता दक्षता म्हणून ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुख्याध्यापक, शिक्षक यांनी विद्यार्थी व पालकांना याबाबत अवगत करावे तसेच शाळेतील सर्व कागदपत्रे व अन्य साहित्य, साधणे सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. याशिवाय विद्यार्थ्यांना सुटी असली तरी शिक्षक व कर्मचारी यांनी परिस्थिती पाहून शालेय कामकाज सुरू ठेवावे असे देखील आदेश पारित करण्यात आले आहे. ( Heavy rain in Lonavala city area Two days holiday announced for schools )
अधिक वाचा –
– लोणावळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, पदाधिकाऱ्यांनी देखील केले रक्तदान । Lonavala News
– पवनमावळ भागातील 186 विद्यार्थ्यांना मिळाला डिजिटल गुरु, रोटरी क्लब मावळकडून स्टडी ॲपचे मोफत वाटप । Maval News
– हुल्लडबाजी करणे, बंदी असलेल्या ठिकाणी जाणे भोवले ; लोणावळ्यात 48 पर्यटकांवर कारवाई । Lonavala News