मावळ तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून ग्रामीण भागात 24 तासापासून मुसळधार पाऊस बरसत आहे. पवन मावळ विभागातील पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला असून गेल्या 24 तासात पवना धरण जलाशयात पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठ्यात तब्बल 4 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. धरणाच्या बॅकवॉटर भागात डोंगराळ क्षेत्र असून इथे मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने ओढे, प्रवाह दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आज रविवार, दिनांक 14 जुलै सकाळी 6 वाजता घेतलेल्या नोंदीनुसार 24 तासात येथे तब्बल 132 मी.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामातील परिसरातील हा सर्वाधिक पाऊस असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. त्यासह धरणाच्या जलसाठ्यात 4 टक्क्यांची वाढ होऊन तो आता 28.77 टक्के इतका झाला आहे. यासह यंदाच्या पावसाची एकूण आकडेवारी 662 मी.मी इतकी झाली आहे. गतवर्षी आजच्या दिवशी धरणात 30.75 टक्के इतका पाणीसाठा होता. ( Heavy rain in Pavana Dam area Water storage at 28 percent )
पवना धरण परिसरात असलेल्या गावखेड्यात सध्या भात शेती जोरात सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे. परंतु परिसरात अशी काही गावे आहेत, जिथे शेतकऱ्यांना ओढे प्रवाह ओलांडून शेतात जावे लागते. सध्या ओढे दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि पाण्याचे प्रवाह जोरात असल्यास सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– मावळात दमदार पावसाची हजेरी ; पवनमावळ भागात चारसूत्री पद्धतीने भात लागवडीला वेग
– मावळ तालुक्यातील एखाद्या गावात 40 प्रवासी असल्यास त्या गावातून पंढरपूरसाठी विशेष बस सोडली जाणार । Maval News
– पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने नौकाविहार नियमावली ; बोट क्लब मालकांसाठी अनेक नियम-अटी, वाचा सविस्तर । Pune News