आज, शनिवार (दि. 6 जानेवारी) पत्रकार दिन निमित्त मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघातील पत्रकार बांधवांना सन्मानित करण्यात आले. मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त (6 जानेवारी) पत्रकार दिन साजरा केला जातो. त्यामुळे पत्रकार संघाच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी स्थानिक, जिल्हा, राज्य, देश तसेच जागतिक पातळीवरील समस्या आपल्या लेखनिच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या व रचनात्मक उपक्रमांना यथायोग्य प्रसिद्धी देणाऱ्या,लोकशाहीचा वैचारिक कणा तसेच चौथा स्तंभ असलेल्या मावळ ग्रामीण पत्रकार संघातील पत्रकार बंधुंना सन्मानित करण्यात आले. जेष्ठ पत्रकार तथा संघाचे अध्यक्ष विजय सुराणा, ज्ञानेश्वर ठाकर, गणेश विनोदे, सचिन ठाकर,सचिन शिंदे, संकेत जगताप,संजय दंडेल, महादेव वाघमारे, योगेश घोडके, अभिषेक बोडके आदिना सन्मानित करण्यात आले. ( Honoring journalists of Maval Taluka on occasion of Journalist Day 6 January )
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वहिले, पुणे जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे , जेष्ठ नागरिक सेल मावळ तालुका अध्यक्ष पांडुरंग दाभाडे, भरत राजीवडे,मावळ तालुका विद्यार्थी कॅाग्रेस अक्षय मु्-र्हे,मा ग्रा.प.सदस्य बारकुभाऊ ढोरे,नरेंद्र मु-र्हे,शंकर मोढवे,बाळासाहेब तुमकर,पंकज भामरे, श्रेयस भिडे,प्रणव ढोरे,राहिल तांबोळी आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘जितेंद्र आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’, मावळ भाजपाचा वडगावात निषेध मोर्चा । Jitendra Awhad
– वेहेरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा मावकर बिनविरोध । Gram Panchayat Election
– वडगांव शहरातील 300 नागरिकांनी घेतला विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग । Viksit Bharat Sankalp Yatra