मावळ तालुक्यातील कामशेत येथे धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. याप्रकरणी कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूरी दशरथ शिंदे (वय 38, रा. कामशेत, ता. मावळ) असे हत्या झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. तर, या प्रकरणी पती दशरथ विठ्ठल शिंदे (वय 43, रा. कामशेत, ता. मावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे. ( Husband Killed His Wife Due To Family Dispute )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (9 जानेवारी) रोजी कामशेत येथे आरोपी पती दशरथ शिंदे याने कौटुंबिक वादाचा राग मनात धरून पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेत त्याची पत्नी मयूरी शिंदे हिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला 13 जानेवारीपर्यंत (शुक्रवार) पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ( Kamshet Crime News Maval Taluka )
सदर घटनेची माहिती मिळताच लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक, पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार आणि उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार हे करत आहेत.
अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग । कामशेत ते मळवली रेल्वे स्टेशन दरम्यान मालगाडीच्या धडकेत अनोळखी वृद्धाचा मृत्यू
– जागरूक नागरिकामुळे वाचले जखमी पक्ष्याचे प्राण, करुंज गावात प्राणीमित्रांकडून लांडोरला जीवदान – पाहा व्हिडिओ