Dainik Maval News : स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण निकम यांनी शहरातील नागरिकांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केलेले होते. या आवाहनाला शहरातील बहुतांशी नागररिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवून घरोघरी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तसेच प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव शहरातील सर्व स्वच्छताप्रेमी नागरिकांनी गणेश विसर्जन करतेवेळी सर्व निर्माल्य विसर्जन स्थळी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशामध्ये टाकून पर्यावरणाचे प्रदुषण रोखण्यासाठी सहकार्य करावे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज बनत चालली आहे. यामुळे सर्व नागरीकांनी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी केले होते.
त्यानुसार शहरात माळीनगर क्रिकेट ग्राउंड जवळ, विजयनगर पीडीसीसी बँक जवळ, केशवनगर पाण्याच्या टाकी जवळ, प्रभाग क्रमांक १६ सकाळी रस्ता लगत, विशाल लॉन्स मागे संभाजी नगर परिसर, वडगाव स्मशानभूमी मागे, वडगांव नगरपंचायत जवळ, साई गार्डन सोसायटी जवळ अशा आठ ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव व निर्माल्य कलश तयार करण्यात आले होते. तसेच नगरपंचायत कार्यालय येथे श्रीगणेश मूर्ती दान केंद्र तयार करण्यात आले होते.
मुख्याधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला नागररिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सुमारे ३९०० श्री गणेश मूर्तींचे कृत्रिम विसर्जन तलावात विसर्जन झाले. सुमारे २ मे.टन निर्माल्य संकलन झाले.
- वृक्ष आहेत पर्यावरणाचे आभूषण, यामुळे कमी होते प्रदूषण
पाण्याचे कराल संरक्षण, वसुंधरेचे होईल रक्षण
एकच ठेवू मिशन, कमी करू वायू प्रदूषण
आपण क्रांती घडवूया, प्लास्टिक प्रदूषण गुडबाय करूया
मिळून सारे वचन घेऊ, वातावरण आपलं स्वच्छ करु
आज वीज वाचवा, उद्या प्रकाश सजवा
हरित सण साजरे करा !
छतावरील पाण्याचे पुनर्भरण करा !
पर्यावरण दूत बना !
अधिक वाचा –
– मावळमधील तिनही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या ; नवीन नियुक्त्या न झाल्याने नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहणार । Maval News
– भक्तिमय वातावरणात, साश्रूनयनांनी गणरायाला निरोप ; तळेगावात नऊ तास चालली विसर्जन मिरवणूक । Maval News
– माध्यमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी समीर गाडे, उपाध्यपदी गणेश साबळे बिनविरोध । Maval News