व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाचा निर्णय ! पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत

पीएमआरडीए ( PMRDA ) क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी अखेर १५ दिवसांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 11, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Important decision 15 day deadline for action against illegal housing projects in PMRDA areas

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पीएमआरडीए ( PMRDA ) क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी अखेर १५ दिवसांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली असून, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेरआढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने शेळके यांच्या प्रयत्नांना अखेर यश लाभले आहे.

नियम डावलून देण्यात येत आहेत पूर्णत्वाचे दाखले
पीएमआरडीए कडून काही मोठ्या गृहप्रकल्पांना कोणतीही शहानिशा न करता, नियमनाचे उल्लंघन करत पूर्णत्वाचे दाखले दिले जात असल्याच्या तक्रारी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत मांडल्या होत्या. त्यावरून १९ जून २०२५ रोजी झालेल्या बैठकीत संबंधित प्रकल्पांची यादी, कारवाईचा तपशील व विकासकांविरोधातील लेखी तक्रारी याबाबत आठ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

दूषित पाणी व सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
बैठकीत सादर करण्यात आलेल्या अहवालात मावळ तालुक्यातील काही प्रकल्पांमधून दूषित व पिण्यायोग्य नसलेले पाणी पुरवले जात असल्याचे स्पष्ट झाले. अनेक प्रकल्पांमधून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट पवना आणि इंद्रायणी नद्यांमध्ये सोडले जात असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. अपुऱ्या नागरी सुविधांमुळे रहिवासी त्रस्त आहेत, तर विकासकांचा मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत.

पंधरा दिवसांत कठोर कारवाईचे आदेश
विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना पुढील १५ दिवसांत ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले. “नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही,” असे ते म्हणाले.

या फेरआढावा बैठकीस संबंधित वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये डॉ. योगेश म्हसे (महानगर आयुक्त, पीएमआरडीए), शेखर सिंह – (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका) सुरेंद्र नवले (उपविभागीय अधिकारी, मावळ), विक्रम देशमुख (तहसीलदार, मावळ) आदींचा समावेश होता.

या निर्णयामुळे मावळ, मुळशी आणि PMRDA क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित पाणी, योग्य सुविधा, पर्यावरण रक्षण आणि कायदेशीर आधार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आमदार सुनील शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा विषय निर्णायक वळणावर पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– गुरुपौर्णिमा विशेष : गुरुंनी पैलू पाडून घडवला लख्ख हिरा ! दिग्गज गुरुंच्या छायेत एक उत्तम कथक नर्तक म्हणून तो नावारुपाला आलाय
– मोठी बातमी! तुकडेबंदी कायदा रद्द होणार, महसूल मंत्र्यांची घोषणा; राज्यातील लाखो शेतकरी, सामान्य नागरिकांना मोठा दिलासा
– अरुंद रस्ता.. खड्ड्यांचे साम्राज्य.. वाहतूक कोंडी अन् नियोजनाचा अभाव ! तळेगाव – चाकण रस्त्यावरील प्रवास ठरतोय शिक्षा


Previous Post

देहूरोड कॅन्टोन्मेंट भागातील विकासकामांसाठी विशेष निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ; पालखी मार्गाच्या विकासाची घोषणा

Next Post

शिष्यवृत्ती परीक्षेत टाकवेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश ; दोन विद्यार्थिनींना जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
शिष्यवृत्ती परीक्षेत टाकवेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश ; दोन विद्यार्थिनींना जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान । Maval News

शिष्यवृत्ती परीक्षेत टाकवेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश ; दोन विद्यार्थिनींना जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
Marathi Language Conservation Fortnight celebrated at Savitribai Phule Women College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उत्साहात साजरा

February 2, 2026
Spontaneous response from women entrepreneurs to BizQuin competition organized by Skilletz Foundation

स्किलेट्झ फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आयोजित बिझक्विन स्पर्धेला महिला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 2, 2026
NCP candidate Pallavi Sandeep Dabhade receives increasing support from voters in Induri Varale Zilla Parishad group Maval

इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवी संदीप दाभाडे यांना मतदारांचा वाढता पाठींबा

February 1, 2026
Voters respond positively to Dr Ashok Vitthal Date candidature in Takve Budruk Nane Zilla Parishad group Maval

टाकवे बुद्रुक – नाणे जिल्हा परिषद गटात डॉ. अशोक विठ्ठल दाते यांच्या उमेदवारीला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

February 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.