वडगाव नगरपंचायत हद्दीतील अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. तसेच धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका पुजा विशाल वहिले यांनी नगरपंचायतीकडे केली आहे.
सोमवारी (दिनांक 17 एप्रिल) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे इथे रस्त्याच्या बाजुला लावलेले एक होर्डिंग्ज कोसळले. या दुर्घटनेत दुर्दैवाने चार महिला आणि एका पुरुषाचा मृत्यु झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका पुजा वहिले यांनी वडगाव शहर आणि हद्दीत असलेल्या होर्डींगचा मुद्दा समोर आणला आहे. ( in background of kiwale accident structural audit should be done of all hoardings in vadgaon nagar panchayat limits )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘व्यवसायिक हेतूने उभारण्यात येणाऱ्या या होर्डिंग्जचा दर्जा आणि मजबुतीबाबत अधूनमधून स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे. जिथे अनधिकृत होर्डिंग्ज असतील त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. वडगाव शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. शहरातील मुख्य चौकात तळेगाव फाटा, वडगाव फाटा, तसेच हायवेच्या दुतर्फा अनेक होर्डिंग्ज आहेत.’
हेही वाचा – दुर्दैवी! जिथे आडोसा घेतला तिथेच काळाने घाला घातला, किवळे इथे होर्डिंग्ज कोसळून 5 जण ठार
“वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. जी होर्डिंग्ज उभी आहेत, त्यापैकी किती अधिकृत व अनधिकृत आहेत याची पडताळणी करून अनाधिकृत होर्डिंग्ज उभ्या करणाऱ्या जाहिरात कंपनीवर, धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई करावी,” अशा मागणीचे निवेदन पत्र नगरसेविका पुजा वहिले यांनी वडगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम, नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांना दिले. यावेळी निवेदन देताना नगरसेविका वहिले, नगरसेवक राजेंद्र कुडे, मंगेश खैरे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी’ – आमदार सुनिल शेळके
– अनधिकृत होर्डिंगकडे महापालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – खासदार श्रीरंग बारणे