विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि. 1 जुलै) नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 64 हजार 222 मते वैध ठरली तर 3 हजार 422 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 32 हजार 112 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
1) ॲड.अनिल विजया दत्तात्रय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना :-44 हजार 784 (विजयी)
2) किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पार्टी :- 18 हजार 772
3) योगेश बालकदास गजभिये :- 89
4) ॲड.अरुण बेंडखळे, अपक्ष :- 39
5) ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहु, अपक्ष :- 11
6) मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष :- 464
7) रोहण रामदास सठोणे, अपक्ष :- 26
8) ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) नि, अपक्ष :- 37
पहिल्या पसंतीची 44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲङ अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले. ( In Mumbai Graduate Constituency Adv Anil Parab won by getting 44 thousand 784 votes )
अधिक वाचा –
– भूतानच्या सीमेवर मावळचा सुपुत्र ! दहिवली गावचे भगवान मावकर यांची ‘नाईक’ पदी नियुक्ती । Karla News
– फौजदारी कायद्यांमधील बदलांबाबत कामशेत पोलिसांकडून जनजागृती, नेमके काय बदल झालेत? वाचा एका क्लिकवर । Kamshet News
– लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क ! थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून नवे आदेश जारी, पर्यटनाबाबत सविस्तर नियमावली जाहीर