Dainik Maval News : आंदर मावळ भागातील निगडे गावात एल अँड टी कंपनीच्या सीएसआर फंडातून प्राथमिक शाळेच्या अत्याधुनिक इमारतीचे निर्माण करण्यात आले आहे. सुमारे अडीच कोटी रुपये निधी खर्च करून ही इमारत बांधण्यात आली असून आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते सोमवारी (दि.3) या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
सहा वर्ग खोल्या, भव्य हॉल, विद्यार्थ्यांनी पिण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी मिळावे यासाठी वॉटर कूलर व अन्य आवश्यक सोयी सुविधा असलेली ही इमारत पाहून आमदार सुनिल शेळके यांनी आनंद व्यक्त केला. इमारत उभारण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे त्यांनी आभार मानले.
आमदारांनी घेतले ग्रामदैवताचे दर्शन
दरम्यान, सोमवारी निगडे गावातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाचा वार्षिक उत्सव होता. तसेच विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहण आणि मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा पार पडला. आमदार शेळके यांनी ग्रामदैवताचे दर्शन घेत अखंड हरिनाम सप्ताहात हभप गणेश महाराज फरताळे यांचे सुश्राव्य कीर्तन श्रवण केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link