व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

निगडी ते पवनानगर पीएमपी बस सुरू करण्याची गरज । Pavananagar News

पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात 'पीएमपीएमएल'ची मावळ तालुक्यात तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा आणि टाकवे बुद्रुक या ठिकाणांपर्यंत बस सेवा सुरु आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 5, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
PMPML

File Photo : PMPML


Dainik Maval News : पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात ‘पीएमपीएमएल’ची मावळ तालुक्यात तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा आणि टाकवे बुद्रुक या ठिकाणांपर्यंत बस सेवा सुरु आहे. परंतु पवन मावळ विभागातील तीस ते चाळीस गावांसाठी प्राथमिक बाजारपेठ असलेल्या पवनानगर पर्यंत अद्यापही पीएमपी बस सेवा नाही. ( Nigdi to Pavana Nagar PMPML Bus )

पवनानगर येथे अनेक शाळा, विद्यालये आहेत. येथील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पिंपरी-चिंचवड, वडगाव, तळेगाव याठिकाणी नित्यनेमाने जात असतात. सोबत तळेगाव – चाकण – आंबी – पिंपरी आदी ठिकाणी दररोज कामासाठी जाणारा कामगार वर्गही मोठ्या प्रामणात आहे. तसेच तळेगाव – वडगाव – कामशेत आणि पिंपरीच-चिंचवड येथे विविध कारणास्तव जाणारा प्रवासी वर्गही मोठा आहे.

  • परिसरातील गावातील हा घटक दररोज पवनानगर येथे येऊन पुढे खासगी वाहनांनी, जीप्स – पिकअप अशा वाहनांनी प्रवास करीत कामशेत येथे पोहचून नंतर पुढचा टप्पा गाठतो. हा प्रवास त्रासदायक व वेळखाऊ आहे. अशावेळी या प्रवाशांना थेट पवनानगर येथूनच निगडी पर्यंत पीएमपी बस सेवा उपलब्ध झाल्यास त्यांचा वेळ – पैसा आणि श्रम तिघांची बच होईल. यामुळे पवनानगर – निगडी पीएमपी बस सेवेची मागणी येथील प्रवाशांकडून होत आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत येथील गावांना पवनानगर, तळेगाव, वडगाव शहरांशी जोडणारी फक्त लालपरी अर्थात एसटी बस ही एकमेव व्यवस्था आहे. परंतु एसटी बसची वारंवारिता आणि उपलब्धता ही विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक यांच्या सोईची नाही. दुसरीकडे थेट निगडी – पवनानगर ही पीएमपी बस सुरू केल्यास या घटकाला निश्चित वेळेत इच्छित स्थळी पोहचता येईल. यामुळे ग्रामीण भागातील या ठिकाणच्या नागरिकांकडून पवनानगर पर्यंत पीएमपी बससेवेची मागणी होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहरात भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाची मोहीम सुरू, नगर परिषदेचे नागरिकांना आवाहन… । Vadgaon Maval

Next Post

निगडे येथील प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । MLA Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Inauguration of new building of primary school in Nigde by MLA Sunil Shelke

निगडे येथील प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.