Dainik Maval News : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे टोलनाका येथे टीम आयएएसतर्फे सर्व लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी मोफत मुक्काम व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आले. जगभरातील सायकल स्वार भारत भ्रमण करीत असताना त्यांना अशा व्यवस्थेचा खूप फायदा होतो.
- मागील दहा वर्षापासून “अतिथी देवो भव, वसुधैव कुटुम्बकम” या उक्तीप्रमाणे संस्थेतर्फे जगभरातील ऍथलेट लोकांचे मोफत मुक्कामाची सोय वडगाव मावळ, लोणावळा, खेड शिवापुर, पुणे, पिंपरी चिंचवड ठिकाणी करण्यात आली आहे. आता यामध्ये अजून एक ठिकाण सोमाटणे टोल नाका समाविष्ट करण्यात आले.
या थांब्याच्या उद्घाटन प्रसंगी आयर्न मॅन सचिन वाकडकर, निलेश म्हेत्रे, महादेव तूपारे, सुरवसे आदी मान्यवर तसेच इंडो ऍथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील, गिरीराज उमरीकर, श्रीकांत चौधरी उपस्थित होते.
भविष्यामध्ये संपूर्ण देशामध्ये अशाप्रकारे सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे इंडो अथलेटिक सोसायटी संस्थेतर्फे सांगण्यात आले. तसेच आपण प्रत्येक टोल नाक्यावर नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया माध्यमातून संपूर्ण देशभर टोलनाक्यावर अशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
याप्रसंगी मुकुंद दांगट पाटील, युवराज पाटील, संदीप परदेशी, सुनील जी चाको, कैलास शेट तापकीर, मदनजी शिंदे, अविनाश चौगुले, मारुती विधाते, अजित गोरे, किरण भावसार, महेंद्र पाटील, नागना इंडी, तुषार पाटील, सतीश भोसले तसेच सोमाटणे टोल प्लाजा येथील कर्मचारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.१० टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, १२ कॉलेजचा निकाल शंभर टक्के । Maharashtra HSC 12th Result 2025
– ‘दैनिक मावळ’ संवाद : ज्येष्ठ नाट्यकलाकार व नाट्यप्रशिक्षक प्रकाश पारखी यांच्याशी खास बातचीत । Drama instructor Prakash Parkhi
– पुणे-लोणावळा तिसर्या-चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पुढे जाणार, रेल्वेकडून डीपीआर तयार ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती