व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंदोरी ग्रामस्थांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी, गावातच होणार सुसज्ज तलाठी कार्यालय, इमारतीचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्यातुन इंदोरी येथे तलाठी कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 7, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
indori-village-maval-taluka

Photo Courtesy : Raju Doundkar


इंदोरी (ता. मावळ) : आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्यातुन इंदोरी येथे तलाठी कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ बुधवार (दिनांक 7 जून) रोजी करण्यात आला. या कामासाठी एकूण 20 लाख 35 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कार्यालयाच्या इमारतीच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले. ( indori village talathi office new building bhumi pujan fund through effort mla sunil shelke )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्यांची कामे ही तलाठी कार्यालयाशी संबंधित असतात. शेतजमिनी संबंधित अभिलेख अद्ययावत रहावेत. तसेच विविध नोंदणी, दाखले यासाठी नागरिकांना नेहमीच तलाठी कार्यालयाची आवश्यकता भासत असते. परंतु तलाठी कार्यालयाची दुरावस्था झाल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. इंदोरी गावात मध्यवर्ती ठिकाणी स्थायिक स्वरुपात सुसज्ज कार्यालय होणार असल्याने इंदोरीसह जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, नाणोली तर्फे चाकण येथील ग्रामस्थांची कामे त्वरित होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

“आमदार सुनिल शेळके यांनी स्थानिकांच्या मागणीची दखल घेऊन गावातच तलाठी कार्यालय बांधण्यासाठी निधी दिला. त्यामुळे तलाठी वेळेवर उपलब्ध होऊन स्थानिक शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची कामे लवकर पूर्ण होतील.” – शशिकांत शिंदे, सरपंच-इंदोरी

हेही वाचा – संत तुकाराम कारखान्याकडे जाणारा रस्ता होणार प्रशस्त; दारुंब्रे-कासारसाई रस्त्यासाठी मोठा निधी

या भूमिपूजन समारंभ प्रसंगी मंडलाधिकारी बी.के.मेकाले, तलाठी एस.पी.पेरके, सरपंच जांबवडे सारिका घोजगे, सरपंच नाणोली मोनिका शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, माजी सभापती विठ्ठल शिंदे, माजी सरपंच दामोदर शिंदे, संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती दिलीप ढोरे, उपसरपंच बाळकृष्ण पानसरे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल शेवकर, मुकेश शिंदे, संदीप नाटक, मधुकर शिंदे, संदीप ढोरे, दत्तात्रय ढोरे, विनोद भागवत, सुरेखा शेवकर, सपना चव्हाण, नीलिमा काशीद, लतिका शेवकर, राजश्री राऊत, धनश्री काशीद, रेश्मा शिंदे, जयश्री सावंत, विष्णू खांदवे, माजी सरपंच माणिक गाडे, मा. उपसरपंच जालिंदर गाडे, रमेश घोजगे, विशाल पवार, जयंत राऊत, रामभाऊ ढोरे, संजय राऊत, हमीद मुलाणी, राहुल सरोदे, सचिन काळे, अण्णासाहेब भेगडे, गणेश शिंदे, रवि राऊत, शिवाजी शिंदे, सुरेश शिंदे, हिरामण गाडे, संदीप गाडे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– किन्हई गावात राष्ट्रवादीकडून ‘एक तास पक्षासाठी’ कार्यक्रम; कार्यकर्त्यांकडून आमदार शेळकेंसाठी मरीमाता मंदिरात यज्ञ
– ‘मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यात धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या सर्व गाड्या पूर्ववत सुरू करा’ – खासदार सुप्रिया सुळे


Previous Post

महत्वाची बातमी! जमीन एनए परवानगीचे अधिकार आता ग्रामपंचायतीला, जाणून घ्या

Next Post

वडगावमध्ये ‘शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची’ उपक्रम, तब्बल 1 हजार 83 नागरिकांनी घेतला लाभ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shasan-aplya-dari

वडगावमध्ये 'शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची' उपक्रम, तब्बल 1 हजार 83 नागरिकांनी घेतला लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.