इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे इथे आयोजित ‘मावळभूषण कृष्णराव भेगडे’ व्याख्यानमालेत पर्यावरण रक्षण आणि संवर्धन यासह सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश संपत गराडे यांना ‘इंद्रायणी विद्यामंदिर पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. ( Indrayani Vidyamandir Award To Nilesh Garade President of Vanyajiv Rakshak Maval Sanstha By BJP MP Vinay Sahastrabuddha )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
निलेश गराडे आणि त्यांची संपूर्ण टीम ही मागील अनेक वर्षांपासून मावळ तालुक्यात वन्यजीव रक्षणाचे आणि पर्यावरण संवर्धण संरक्षणाचे काम करत आहे. अहोरात्री पर्यावरण रक्षणासाठी काम करणारे निलेश गराडे यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याचा उचित गौरव आहे. भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते गराडे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.
इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतर्फे ‘मावळभूषण कृष्णराव भेगडे’ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेचे यंदाचे हे आठवे वर्ष होते. मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी तालुक्यातील शिक्षण, उद्योग, साहित्य, समाजकारण आणि सहकार क्षेत्रात अमुल्य योगदान दिले आहे. त्यांचे कार्य आणि विचार युवा पिढीपर्यंत पोचवण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. ( Indrayani Vidyamandir Award To Nilesh Garade President of Vanyajiv Rakshak Maval Sanstha By BJP MP Vinay Sahastrabuddha )
अधिक वाचा –
– ‘मावळभूषण कृष्णराव भेगडे’ व्याख्यानमाला : खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी ‘भारताची सौम्य संपदा’ विषयावर मांडले विचार
– उल्लेखनीय समाजकार्याबद्दल आण्णासाहेब दाभाडे यांना पानिपतकार विश्वास पाटलांच्या हस्ते ‘इंद्रायणी विद्यामंदिर पुरस्कार’