इंदू राणी दुबे ( Indu Rani Dubey ) यांनी नुकताच पुणे रेल्वेच्या ( Pune Railway ) व्यवस्थापकदाचा कार्यभार स्विकारला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे विभागाशी संबंधित विविध योजनांची माहिती दिली. अपर व्यवस्थापक बी. के. सिंह, वरिष्ठ अभियंता पी. के. चतुर्वेदी, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाहतूक व्यवस्थापक डॉ. स्वप्निल नीला, जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. ( Indu Rani Dubey takes over as Pune divisional railway manager )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे-लोणावळा ( Pune Lonavla Railway ) दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या ( Lokal Railway ) दुपारच्या फेऱ्या पूर्ववत न झाल्याने या मार्गावर दररोजचा प्रवास करणारे विद्यार्थी आणि नोकरदारांची होणाऱ्या गैरसोयीबाबत इंदू दुबे यांना विचारले असता, प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने दुपारच्या वेळेतील लोकलच्या फेऱ्या पूर्ववत करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
सध्या पुणे-लोणावळा मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यातून लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग प्रतितास 110 वरून 130 किलोमीटर करण्यात येईल. या नियोजनातून उपनगरीय वाहतुकीतील फेऱ्यांची संख्या वाढू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा –
– लोणावळा बस स्टँड परिसरात 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग, तरूणावर गुन्हा दाखल
– ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ अंतर्गत आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून कातकरी बांधवांना जातीचे दाखले वाटप
– ग्रामपंचायत निवडणूक 2022 : मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या 83 जागांसाठी 225 उमेदवारी अर्ज, सरपंच पदासाठी 51 अर्ज