हल्ली भाडेकरू ठेवताना घर मालक (home owner) कराराशिवाय घर भाड्याने देत नाहीत. तसेच पोलीस प्रशासनाने (police) भाडेकरूंसाठी ठेवलेल्या काही अटींमुळे अनेकदा भाडेकरू ही मिळत नसल्याच्या समस्या जाणवतात. या सगळ्यावर मुद्रांक शुल्क विभागाने मार्ग काढला आहे. त्यामुळे घर मालकांनाही मोठा दिलासा मिळला आहे. आता घरमालक आणि भाडेकरू यांच्यात ऑनलाइन भाडेकरार (Online lease agreement) (लिव्ह अण्ड लायसन्स) झाल्यानंतर घरमालकांना प्रत्यक्षात पोलिस ठाण्यांत जात माहिती देण्याची गरज नसणार आहे. तसेच, नोटरी अथवा ऑफलाईन कटकटी दुर झाल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे भाडेकरार नोंदविल्यानंतर त्याची माहिती क्राईम अॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क आणि सिस्टीम्सद्वारे पोलिसांना ऑनलाइन मिळत आहे. त्यामुळे पूर्वीसारखे शंभर किंवा पाचशे रुपयांच्या मुद्रांकावरील भाडेकरार आता कालबाह्य होताना दिसतायेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे नोंदवण्यात येणारे ऑनलाइन भाडेकरार कायदेशीर करण्यात आले आहेत. मात्र, याबाबत अद्यापही म्हणावी तितकी जनजागृती झाली नाही. त्यामुळे आजही अनेकठिकाणी प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात जाऊन माहिती देण्यावर भर दिला जात आहे. ( information on rental agreement registration process online and offline )
‘लिव्ह अँड लायसेन्स’
भाडे करार करायचाय? एजंट हजारो रूपये मागतोय? काळजी करू नका. कोणत्याही एजंटला जास्तीचे पैसे देण्याची गरज नाही
भाडे करार सुविधा ऑनलाईन उपलब्ध
भाडे, डिपॉजिट, कराराचा कालावधी टाकून अग्रिमेंटसाठी किती खर्च लागतो ते पण तपासू शकता
लिंक
— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) November 26, 2023
गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने शिक्षण, नोकरी-व्यवसायासाठी लोकांचा शहरांत जाण्याचा कल वाढला आहे. कोणत्याही कारणासाठी शहरात वास्तव्यास आल्यावर प्रत्येकाला लगेच स्वतःचं घर खरेदी करणं शक्य नसतं. अशावेळी लोकांसमोर भाडेतत्त्वावर घर घेणं हा एकमेव पर्याय असतो. घर भाड्याने घेतेवेळी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं घरमालक आणि भाडेकरूसाठी आवश्यक असतं. रेंट अॅग्रीमेंट अर्थात भाडे करार हा त्यापैकीच एक भाग होय. रेंट अॅग्रीमेंट करण्यासाठी खूप धावपळ आणि मेहनत करावी लागते. यामुळे घरमालक आणि भाडेकरू अशा दोघांचाही वेळ आणि पैसा खर्च होतो. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता रेंट अॅग्रीमेंट अगदी घरबसल्या करता येणार आहे.
ऑनलाईन भाडे करार करण्यासाठी लिंक – https://efilingigr.maharashtra.gov.in/ereg/
अधिक वाचा –
– कोथूर्णे गावातील विविध विकासकामांचे माजी मंत्री बाळा भेगडेंच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण
– वडगावच्या शैलेश वहिलेंचा प्रामाणिकपणा; सापडलेली कागदपत्रे मुळ मालकाला शोधून दिली परत
– मोठी बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 2 दिवस ट्राफिक ब्लॉक, ‘या’ गाड्या होणार रद्द, वाचा सविस्तर