Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरात मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वच्छता हि सेवा” उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, तळेगाव दाभाडे रोटरी सिटी क्लब, स्माईल ग्रुप यांच्या सहभागातून आणि अशोक एंटरप्रायजेस मधील सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मोहिम राबविली जाणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी आयपीएस वैभव निंबाळकर यांनी स्वच्छतेसाठी विशेष शपथ घेतली आणि या शपथेचे पालन करण्याचे आदेश दिले. यावेळी अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी स्वच्छतेला अधिक महत्व देण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला. या मोहिमेचा उद्देश शहरातील प्रत्येक विभागात स्वच्छता सुनिश्चित करणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेच्या महत्त्वाची जाणीव निर्माण करणे हा आहे.
आयपीएस वैभव निंबाळकर, कमांडंट मोहम्मद युसूफ, उपमुख्याधिकारी ममता राठोड, अभिनेता मिलिंद गुणाजी, मल्लिकार्जुन बनसोडे, कल्याणी लाडे, रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल, विलास काळोखे, ए.जी. दिपक फल्ले, सुरेश दाभाडे, प्रदीप टेकवडे, संतोष परदेशी, प्रशांत ताये, प्रमोद फुले, तुकाराम मोरमारे हे प्रतिनिधी, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– गणेश मंडळांना भेटीचे निमित्त.. बापूसाहेब भेगडे यांनी मावळ विधानसभेचे रणशिंग फुंकले, तालुक्यात चर्चेला सुरूवात । Maval Vidhansabha
– पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला वडगावकर नागरिकांचा प्रतिसाद ; 3900 गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन । Vadgaon Maval
– आता मावळातच होणार कॅन्सरवर उपचार : तळेगाव येथे मोफत कॅन्सर उपचार सुविधेचा शुभारंभ । Talegaon Dabhade