लोणावळा (Lonavala Pilice) उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक (PS Satyasai Karthik) यांच्या पथकाने लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत अवैध गुटख्याची साठवणूक करणाऱ्या दोन जणांवर धडक कारवाई (Crime) केली. या कारवाईमध्ये सुमारे 1 लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त (Gutkha Seized) करण्यात आला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकरल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली आहे. (IPS Satyasai Karthik Raids In Lonavala City And Rural Gutkha worth 1 Lakh Seized 2 People Detained)
त्यावरून सत्यसाई कार्तीक यांनी गुरुवारी (दिनांक 22 फेब्रुवारी 2024) रोजी त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले. त्यानंतर पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी छोपे टाकले. यात लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत मौजे औंढे (ता. मावळ) येथे 1) मच्छिंद्र किसन घनवट (वय 32 वर्ष) हा त्याच्या मालकीचे खोलीमध्ये आणि लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत 2) धवल रमेश लुनावत हा त्याच्या मालकीचे स्टोअर्समध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा एकूण सुमारे 1,02,209 रुपये (अक्षरी एक लाख दोन हजार दोनशे नऊ रूपये) एवढ्या किमतीचा गुटखा जप्त करून नमूद दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अनुक्रमे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन आणि लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 328 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण व लोणावळा शहर पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पोलिस हवालदार अंकुश नायकुडे, पोलिस हवालदार बंटी कवडे, मपोहवा आशा कवठेकर, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे यांच्या पथकाने केली.
अधिक वाचा –
– बिग ब्रेकिंग! शरद पवार यांच्या पक्षाला नवीन चिन्ह मिळाले, महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृतीसोबत चिन्हाचे घट्ट नाते । Sharad Pawar Party New Symbol
– कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा! नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 1792 कोटींचा निधी उपलब्ध
– शासनाच्या ‘माझी शाळा – सुंदर शाळा’ उपक्रमात कान्हे शाळा तालुक्यात अव्वल! जिल्हा स्तरावर बाजी मारण्यासाठी शाळेची तयारी