Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर यापुढे आयटीएमएस प्रणालीद्वारे प्रत्येक वाहनावर करडी नजर असणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना वेगमर्यादेसंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. द्रुतगती मार्गावर ‘आयटीएमएस’ प्रणालीअंतर्गत 52 ठिकाणी दोन्ही लेनवर कृत्रिम बुद्धीमत्तेवर (एआय) आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यात रडार तंत्राचा वापर करुन वाहनांचा वेग मोजण्यात येत असून वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्यास संबंधित वाहनधारकांना इ-चलान देण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. द्रुतगतीमार्गावरील घाट परिसरामध्ये हलके मोटार वाहनाची (कार) वेग मर्यादा 60 किमी प्रतितास आहे. उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा 40 किमी प्रतितास आहे. घाट परिसर वगळता इतर ठिकाणी हलके मोटार वाहन (कार) ह्यांची वेग मर्यादा 100 किमी प्रतितास असून उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा 80 किमी प्रतितास आहे.
आयटीएमएस प्रणाली अंतर्गत बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे सीटबेल्ट परिधान न करणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, लेनची शिस्त न पाळणे आदी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांना इ-चलान देण्यात येत आहे. यामुळे सर्व वाहन धारकांनी वाहतूक करताना सर्व नियमांचे पालन करावे व वेग मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांनी केले आहे.
आयटीएमएस प्रणाली म्हणजे काय?
‘आयटीएमएस’ म्हणजे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचे नियंत्रण होईल. द्रुतगती मार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या ते वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या अशा सर्वच वाहनांच्या नोंदी ठेवतील.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देवाभाऊ 3.0 : “मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” राज्यात नव्या ‘देवेंद्र’पर्वाचा आरंभ । Maharashtra New CM
– मुख्यमंत्री बनताच देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर, पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
– “मी अजित आशाताई अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की… अजित पवार यांनी विक्रमी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ