पीडीसीसी बँकेचे ज्येष्ठ संचालक, सहकारमहर्षी माऊली दाभाडे यांच्या उपस्थितीत व्यापारी आणि शेतकरी बांधव यांच्या समवेत पीडीसीसी बँक कामशेत येथे भात खरेदी संदर्भातील संयुक्त बैठक आज (बुधवार, 11 नोव्हेंबर) रोजी संपन्न झाली. या बैठकीला आमदार सुनिल शेळके उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन व्यापारी बांधवांनी देखील चांगल्या भावाने भात खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. सर्व व्यापारी बांधव, शेतकरी बांधव व पीडीसीसी बँक यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. इंद्रायणी भाताला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, चांगला दर मिळावा, मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता यावी यासाठी सुरु असलेल्या आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल, अशी आशा आहे”, असे यावेळी सुनिल शेळके म्हणाले.
हेही वाचा – दोन पोती खरेदी करत अजित पवारांकडून मावळमधील ‘इंद्रायणी भात खरेदी’ उपक्रमाचा शुभारंभ
‘विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या शुभहस्ते झालेल्या ‘इंद्रायणी भात खरेदी’ कार्यक्रमानंतर मावळातील माझ्या शेतकरी बांधवांचा फायदा होत आहे, याचे आज समाधान वाटते’, असेही शेळके म्हणाले.
अधिक वाचा –
– देव तारी त्याला कोण मारी! एका ड्रायव्हरच्या समयसुचकतेमुळे वाचला दुसऱ्या ड्रायव्हरचा जीव, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील घटना
– आमदार शेळकेंच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींची आढावा बैठक संपन्न