इंद्रायणी नदीपात्रात कपडे धुवून घरी परतत असताना रेल्वेची धडक बसल्याने आईसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कामशेत येथे घडली आहे. एक्स्प्रेस रेल्वेची धडक बसल्याने सदर महिला व मुलगा हे जागीच ठार झाले. मंगळवार (दिनांक 27 सप्टेंबर) रोजी सकाळच्या सुमाराच ही दुर्घटना घडली. ज्या दोन मुलांसमोर हा थरार घडला त्यांनी ही संपूर्ण घटना कथन केली. ( Kamshet Train Accident Mother And Child Death )
गोदावरी गणेश देवाडे (वय 28), ओम गणेश देवाडे (वय 6) दोघे रा. शिंदे चाळ, कामशेत, असे रेल्वे धडकेत मृत्यू पावलेल्या मायलेकाचे नाव आहे. कामशेत रेल्वे स्टेशन ( Kamshet Railway Station ) येथे हा अपघात सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. ( Mother And Child Death in Train Accident )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, गोदावरी देवाडे, ओम देवाडे यांच्यासह चार वर्षाचा मुलगा व दीड वर्षाची मुलगी हे इंद्रायणी नदीपात्रात धुणे धुण्यासाठी गेले. धुणे धुवून परत घरी परतत असताना गोदावरी यांनी कामशेत रेल्वे स्टेशनवर लोहमार्ग ओलांडत अगोदर ४ वर्षाचा मुलगा व दीड वर्षाची मुलगी प्लॅटफॉर्मवर सोडली. त्यानंतर ओम याला घेऊन येत असताना कोइमतूर-कुर्ला एक्स्प्रेस रेल्वेची त्यांना जोरात धडक बसली ( Kamshet Train Accident ) आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. अगोदर रेल्वे प्लॅटफॉर्मवर सोडलेल्या चार वर्षाचा मुलगा आणि दीड वर्षाच्या मुली समोर ही संपूर्ण घटना घडली.
अधिक वाचा –
लोणावळा पोलिस चौकीबाहेर राडा, वाद मिटवायला गेलेल्या पोलिसालाही धक्काबुक्की, गुन्हा दाखल
PHOTO : आमदार सुनिल शेळकेंनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन, मावळवासियांसाठी केली प्रार्थना I नवरात्रोत्सव 2022