शासन निर्देशानुसार दिनांक 17 सप्टेंबर 2022 ते दिनांक 2 ऑक्टोबर 2022 हा कालवधी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ( Rashtraneta to Rashtrapita ) – सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांचा जन्मदिवस ( Birthday ) ते महात्मा गांधी यांची जयंतीपर्यंत हा सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असून या अंतर्गत सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
नुकताच मावळ तालुका ( Maval Taluka ) तहसील कार्यालयामार्फत वडगाव येथे महासेवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याच धर्तीवर कामशेत शहरातील श्री गणेश मंगल कार्यालय इथेही महासेवा मेळावा आयोजित करण्यात आला. ( MahaSeva Camp At Kamshet City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या मेळाव्यात नागरिकांनी खालील सेवांचा लाभ घेतला,
- उत्पन्नाचा दाखला ,जातीचा दाखला – 49
- नवीन शिधापत्रिका दुबार पत्रिका साठी – 98
- मतदार नवीन नोंदणी, दुरुस्ती, मयताचे नाव कमी करणे – 93
- आधार कार्ड काढणे, दुरुस्ती – 46
- संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ, योजना इंदिरा गांधी योजना – 3
- कृषी विषयक सेवा माहिती – 23
- मंडळ अधिकारी अहवाल, फेरफार निर्गत, तक्रार केस निर्गत – 7
- तलाठी कार्यालय उत्पन्नाचा दाखला, सातबारा देणे – 69
असे एकुण 390 नागरिकांनी महासेवा मेळाव्यात विविध सेवांचा लाभ घेतला. या महासेवा मेळावा कार्यक्रमात मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजावून घेत तात्काळ सोडवल्या. यावेळी नागरिकांना तात्काळ रेशन कार्ड, उत्पन्न दाखला मिळत असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
View this post on Instagram
सदर कार्यक्रमाला मावळ भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, किरण राक्षे, मच्छिंद्र केदारी, सामाजिक कार्यकर्ते दत्ता काजळे, अभिमन्यू शिंदे, प्रवीण शिंदे आदी स्थानिक पदाधिकारी यांनी भेटी दिल्या. सदर मेळावा यशस्वी होण्यासाठी तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार संतोष सोनवणे, मंडल अधिकारी सुरेश जगताप, अव्वल का. मुकुंद खोमने, अव्वल का. आशा धायगुडे, तलाठी योगेश वाघ, गणेश पोतदार, रवी मोरुद, किरण जगताप, रमेश कोल्हे, प्रसाद भाडाळे आदी तलाठी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. ( MahaSeva Camp At Kamshet City 390 Citizens Took Advantage Of Government Services In Melava )
अधिक वाचा –
मावळ तहसील कार्यालयाकडून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत ‘महासेवा मेळावा’
शिवतीर्थावर घुमणार आव्वाज ठाकरेंचा..! कोर्टाच्या निर्णयानंतर मावळमधील शिवसैनिकांचा जल्लोष, पाहा Video
View this post on Instagram