स्व. आ मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं (आठवले गट), शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती आदींसह महायुतीतील सर्व घटक पक्ष पूर्ण ताकदीने लढवायचा निर्धार आज (शुक्रवार, 3 फेब्रुवारी) करण्यात आला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा सहयोगी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह बैठक आज संपन्न झाली. ( Kasba Chinchwad Assembly By-Election Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘कसबा विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा परंपरागत मतदारसंघ आहे. आदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वांची भूमिका आहे. मात्र, तरीही गाफील न राहता ही निवडणूक भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं (आठवले गट), शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती यांच्यासह सहयोगी घटक पक्ष सर्वजण पूर्ण ताकदीने लढवणार आहेत.’ ( BJP And Balasahebanchi Shiv Sena Alliance Will Fight With Full Strength Said Chandrakant Patil )
‘पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा पक्षाची राष्ट्रीय निवड समिती करेल. त्यामुळे महायुतीच्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते यासाठी कामाला लागले आहेत. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दोन्ही मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील’, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यामुळे दोन्ही ठिकाणचे उमेदवार ठरले आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
माझे सहकारी मुक्ताताई टिळक आणि लक्ष्मणराव जगताप यांच्या निधनामुळे २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची नावं पक्षनेतृत्वाकडे पाठवली आहेत. दिल्लीहून आज रात्रीपर्यंत उमेदवारांच्या घोषणेची शक्यता आहे. (1/2) #Pune #Byelection pic.twitter.com/0SQsJWrhlj
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) February 3, 2023
यासह बिनविरोध निवडणुकीसंदर्भात विचारले असता, ‘कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पक्षाच्या नेत्या आमदार माधुरी मिसाळ यांनी सर्वच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला आहे. दोन्ही जागा बिनविरोध करण्यासाठी पत्र देखील पाठवले आहे. त्या पत्रांच्या उत्तराची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. तसेच राज्य स्तरीय नेते देखील सर्व प्रमुख नेत्यांच्या संपर्कात असल्याचे’ पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा – विधान परिषद निवडणूक : कोकणात झटका तरीही राज्यात मविआचाच डंका, भाजप पराभवाचं चिंतन करणार, पाहा सर्व निकाल
संदीप खर्डेकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती
कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्याकडे महायुतीतील सर्वच घटक पक्ष आणि विविध ज्ञाती संस्थांशी संपर्कासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.
या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, बाळासाहेबांची शिवसेनाचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे, प्रदेश सचिव किरण साळी, संपर्कप्रमुख अजय भोसले, लीनाताई पानसरे, पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश कोंडे, प्रसिद्धीप्रमुख संजय अगरवाल, रिपाइं आठवले गट शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, डॉ. सिद्धार्थ धेंडे, ॲड. मंदार जोशी, बाळासाहेब जानराव, शिवसंग्रामचे भारत लगड, कालिंदीताई गोडांबे, पतितपावन संघटनेचे स्वप्नील नाईक, राजाभाऊ पाटील, दिनेश भिलारे, मनोज नायर, श्रीकांत शिळीमकर भाजपा नेते शैलेश टिळक, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, गणेश बिडकर, धीरज घाटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, भाजपा कसबा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पांडे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प’, केंद्रीय अर्थसंकल्पावर खासदार श्रीरंग बारणेंची विस्तृत प्रतिक्रिया, वाचा…
– पोलिसांना मारहाण करुन फरार झालेल्या आरोपींना जेरबंद करण्यात यश; कामशेत पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी