कामशेत : श्री विठ्ठल परिवार मावळ व आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने नवीन वर्षात कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कामशेत इथे उद्या सोमवार, दिनांक 1 जानेवारीपासून कीर्तन महोत्सव सुरु होणार असल्याची माहिती कीर्तन महोत्सव समिती अध्यक्ष दिलीप महाराज खेंगरे, श्री विठ्ठल परिवार अध्यक्ष गणेश महाराज जांभळे, विठ्ठल नाम जप समिती प्रमुख नितीन महाराज काकडे आदींनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या कीर्तन महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते. किर्तन महोत्सवाचे यंदा सहावे वर्ष असून कामशेत येथे साजऱ्या होणाऱ्या भव्य कीर्तन महोत्सवात यावर्षीही महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची दररोज सायंकाळी सहा वाजता सुश्राव्य कीर्तने होणार आहेत. मावळातील कानाकोपऱ्यातून विशेषत: ग्रामीण भागातून भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत असतात. या कार्यक्रमासाठी कामशेत येथील मैदानात भव्य मंडप पार्कींग व्यवस्थेसह उभारण्यात आला आहे. ( Kirtan festival organized by Shri Vitthal Parivar Maval and MLA Sunil Shelke at Kamshet )
सोमवार, 1 जानेवारीला एकनाथ महाराज चत्तर, मंगळवार 2 जानेवारीला विशाल महाराज खोले, बुधवार 3 जानेवारीला बाळू महाराज गिरगावकर, गुरुवार 4 जानेवारीला योगीराज महाराज गोसावी तसेच कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवार 5 जानेवारीला अक्रूर महाराज साखरे यांचे सकाळी 10 ते 12 यावेळेत काल्याचे किर्तन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन किर्तन श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! संजोग वाघेरे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी स्वतः बांधलं शिवबंधन, मावळ लोकसभेची उमेदवारी फिक्स?
– खंडाळ्यात अवैधरित्या दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी पोलिसांचा छापा! दारूचा मोठा साठा जप्त । Lonavala Crime News
– एकाचवेळी 6 विषारी घोणस सर्पांना जीवदान! शेततळ्यातून सापांना बाहेर काढताना सर्पमित्रांची कसोटी । Raigad News