सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता सरकारी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी फक्त बीएड अभ्यासक्रम इतकाच दर्जा असणार नाहीये, तर आता ITEP कोर्स त्याची जागा घेण्याची शक्यता आहे. ह्या कोर्सची रचना राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच NCTE ने केली आहे. याला एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम म्हणजेच ITEP असे नाव देण्यात आले आहे.( Know About ITEP Course )
4 वर्षांच्या चा अभ्यासक्रमानंतर 2030 नंतर शिक्षक भरती केवळ ITEP अभ्यासक्रमाद्वारेच पूर्ण होईल आणि हा अभ्यासक्रम पात्रतेमध्ये समाविष्ट केला जाईल, अशी माहिती समोर येत आहे. सध्या हळूहळू राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उच्च शिक्षणापासून प्राथमिक शिक्षणापर्यंत लागू केले जात आहे. एवढेच नाही तर अध्यापन क्षेत्रातही नवे बदल होणार आहेत. त्यामुळे 2030 पासून चार वर्षांचा बीएड किंवा चार वर्षांचा एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP) पदवी अनिवार्य करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
महत्वाचं म्हणजे बीएड अभ्यासक्रम सुरू राहणार आहे, परंतु तो केवळ शैक्षणिक असेल. त्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडी करू शकाल. आयटीईपी अभ्यासक्रमाचा पर्याय बहुतांश बीएड महाविद्यालयांमध्ये पुढील सत्रापासूनच सुरू होऊ शकतो. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या शिफारशींनुसार, बालवाडी ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी किमान पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये BA-B.Ed, B.Sc-B.Ed आणि B.Com-B.Ed यांचा समावेश आहे. सध्या 2023-24 या शैक्षणिक सत्रापासून 41 विद्यापीठांमध्ये प्रायोगिक प्रकल्पात चार वर्षांचा बीएड कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCETE) NEP 2020 च्या शिफारशींनुसार चार वर्षांचा B.Ed कार्यक्रम सुरू करत आहे.
ह्या कोर्ससाठी परिक्षा देणाऱ्या उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाईल. सत्र 2024-25 पासून आयटीईपी या 4 वर्षांच्या एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमाच्या पथदर्शी प्रकल्पासाठी विद्यापीठांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आता हा नवीन बी.एड कार्यक्रम नवीन शिक्षण मॉडेलनुसार मुलांना शिकवण्यासाठी तयार केला जाणार आहे. ( BEd Will Not Criteria for Primary Teachers )
अधिक वाचा –
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून त्या करताहेत लोकजागर; नकुसाबाई लोखंडेंचा प्रेरणादायी जीवनप्रवास
– ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची । अभिवादन नवदुर्गांना