भारतीय वंशाचे ऋषी सुनक ( Rishi Sunak ) हे द ग्रेट ब्रिटन अर्थात युकेचे ( इंग्लंड ) पुढील पंतप्रधान असणार आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या ( Great Britain ) पुढील पंतप्रधानपदी ( Prime Minister ) निवडीची घोषणा होताच भारतातही फटाके फोडण्यात आले; याचे कारण ऋषी सुनक यांचे आणि भारताचे घनिष्ठ नाते आहे.
ब्रिटनच्या पूर्व पंतप्रधान लीझ ट्रस यांनी 20 ऑक्टोबर रोजी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ब्रिटनचे नवे पंतप्रधान कोण असेल, यावर जगभरात चर्चा सुरु होती. यात बोरिस जॉन्सन, ऋषी सुनक आणि पेनी मॉर्डेंट ही तीन नावे आघाडीवर होती. पैकी, माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी निवडणूकीतून माघार घेतली. ऋषी सुनक यांना 185 हून अधिक खासदारांनी पाठिंबा दिला आहे, तर प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डंट यांना केवळ 25 खासदारांचा पाठिंबा मिळू शकला. त्यामुळेच ऋषी सुनक हे पुढील पंतप्रधान असणार हे निश्चित झाले आहे. दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सुनक हे पंतप्रधानपदाची शपथ घेतील. ( Know About Rishi Sunak India Connection Who Becomes New Prime Minister Of United Kingdom Great Britain )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
Seems like @RishiSunak is Prime Minister designate for the UK now.
He comes in during tough economic times for the UK, along with high political instability.
Wishing him well and I also further hope he strengthens the bond of ???????? with ???????? in the days to come. @UKinMumbai— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 24, 2022
ऋषी सुनक यांचे भारताशी असलेले कनेक्शन :
ऋषी सुनक यांचे आईवडील भारतीय वंशाचे होते. मात्र, त्याचे कुटुंब पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आले होते. ऋषी सुनक यांचा जन्म 1980 मध्ये साउथॅम्प्टनमध्ये झाला. ऋषी सुनक यांचे आजोबा पंजाबचे आहेत. सुनक यांचे शिक्षण कॅलिफोर्नियातील विंचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात खासगी बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. ते अमेरिकेतच त्याची पत्नी अक्षता मूर्तीला भेटले. अक्षता मूर्ती या भारतीय अब्जाधीश नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत.
View this post on Instagram
ऋषी सुनक यांनी संसदेत भगवदगीतेला स्मरून यॉर्कशायरचे खासदार म्हणून शपथ घेतली. असे करणारे ते पहिले ब्रिटनचे खासदार होते. तसेच भगवदगीतेला स्मरून पंतप्रधान पदाची शपथ घेणारेही कदाचित ते ब्रिटनचे पहिले पंतप्रधान असतील.
अधिक वाचा –
– “मोदी सरकारचा ‘ रोजगार मेळा ’ म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरचा केवळ एक इव्हेंट !”
– “राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न नाही, नेतृत्वावरील नाराजीमुळे तो पक्ष स्वतःहून बुडेल”