व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कुंडमळा पूल दुर्घटना : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 51 जखमी, अजुनही शोधकार्य सुरू

सदर लोखंडी पूल हा आजुबाजूच्या दोन गावांना जोडणारा लोखंडी पूल असून सदर लोखंडी पूल हा सुमारे 30 वर्ष जुना आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 15, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Kundamala bridge accident 4 people died 51 injured in bridge collapse accident on Indrayani river Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदोरी) येथील इंद्रायणी नदी वरील लोखंडी पूल कोसळल्याची दुर्घटना रविवारी, दिनांक 15 जून 2025 रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास घडली आहे. सदर लोखंडी पूल हा आजुबाजूच्या दोन गावांना जोडणारा लोखंडी पूल असून हा लोखंडी पूल सुमारे 30 वर्ष जुना आहे.

  • रविवारी कुंडमळा या ठिकाणी अंदाजे 100 ते 125 पर्यटक वर्षाविहारासाठी आले असता लोखंडी पुल कोसळून त्या खाली काही पर्यटक अडकले असल्याचे समजताच सदर ठिकाणी बचावकार्यासाठी स्थानिक प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे 2 पथक, पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलीस यंत्रणा, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), आपदा मित्र, पुणे / पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (PMRDA) चे अग्निशमन दल, शिवदुर्ग संघटना, वन्यजीव संघटना यांचे मार्फत शोधकार्य सुरु केले होते.

रात्री उशीरापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेमध्ये एकूण 51 व्यक्ती जखमी झाले असून जखमी व्यक्तींना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, ता. मावळ येथील 1) पवना रुग्णालय, 2) मायमर हॉस्पिटल, 3) अथर्व हॉस्पिटल आणि 4 ) युनिक हॉस्पिटल मध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे. सदर घटनेत एकूण 04 व्यक्तींचा मृत्यू झाला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

  • इंद्रायणी नदीपात्रात कोसळलेला लोखंडी पूल क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. तसेच सदर घटनास्थळी मंत्री आपत्ती व्यवस्थापन, मंत्री- मदत व पुनर्वसन, विभागीय आयुक्त-पुणे विभाग, खासदार बारामती लोकसभा, आमदार मावळ विधानसभा, जिल्हाधिकारी पुणे उपविभागीय अधिकारी- मावळ, तहसिलदार मावळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तळेगाव दाभाडे हे उपस्थित होते.

ह्या घटनेच्या अनुषंगाने अधिक माहिती आवश्यक असल्यास नियंत्रण कक्षाच्या खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे…
टोल फ्री 1077
नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र.: 020-26123371, 26133522, 26133523
विठ्ठल बनोटे (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी) 8975232955
राहुल पोखरकर ( आपत्ती व्यवस्थापन कक्ष सहाय्यक) : 8888565317

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ ; मावळ तालुक्यातील 24 शाळांचा समावेश
– केंद्र सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी बनविलेली नियमावली महाराष्ट्रात तातडीने लागू करा ; मावळ पोल्ट्री संघटनेचे निवेदन
– देहूरोड खून प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक ; पोलिसांनी गुजरातच्या वडोदरातून घेतले ताब्यात । Maval Crime
– विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले तज्ज्ञांचे मार्गदर्शन । Maval News


Previous Post

मोठी बातमी : मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती

Next Post

कुंडमळा येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, दोषींवर कठोर कारवाई होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार । Kundmala Indrayani River Bridge Accident

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Kundmala Indrayani River Bridge Accident is very unfortunate strict action will be taken against culprits DCM Ajit Pawar

कुंडमळा येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, दोषींवर कठोर कारवाई होणार - उपमुख्यमंत्री अजित पवार । Kundmala Indrayani River Bridge Accident

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.